America : केंटकीमध्ये अचानक आलेल्या पुरामुळं 16 जणांचा मृत्यू

लोकांना बोटीद्वारे पुरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय.
America Flood News
America Flood News esakal
Updated on
Summary

लोकांना बोटीद्वारे पुरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय.

America Flood News : यूएस राज्याच्या पूर्वेकडील भागात मुसळधार पावसामुळं (Heavy Rain In America) पूर आल्यानं केंटकीच्या अॅपलाचियन्समध्ये (Kentucky Appalachian) किमान 16 लोकांचा मृत्यू झालाय. त्याचवेळी इतर लोकांना बोटीद्वारे पुरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय. बचाव पथक आपत्तीग्रस्त भागात शोध घेत असल्यानं मृतांची संख्या वाढणार असल्याचं सांगण्यात येतंय.

केंटकीच्या गव्हर्नरनं (Governor of Kentucky) सांगितलं की, पुरातील सर्व बळी शोधण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. या पुरात आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झालाय. कारण, मुसळधार पावसामुळं अॅपलाचिया शहरं जलमय झालं असून येत्या काही दिवसांत आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अनेक ठिकाणी बचावकार्यासाठी बचाव पथकाला मोठा संघर्ष करावा लागतोय.

America Flood News
Monkeypox Virus : मंकीपॉक्सचा धोका वाढला; स्पेनमध्ये मृत्यूची पहिली नोंद

पूर्व केंटकीच्या काही भागात 48 तासांत 20 ते 27 सेंटीमीटर पाऊस पडल्यानंतर शुक्रवारी पहाटेही मोठा पाऊस झालाय. राज्याचे गव्हर्नर अँडी बेशियर (Governor Andy Beshear) म्हणाले, 'अचानक आलेल्या पुरात किती लोक मरण पावले याची आकडेवारी आम्ही सतत अपडेट करत आहोत. काही बाधित भागात नेमके किती लोक उपस्थित होते, हे कळणं कठीण आहे. सध्या बचाव पथकानं बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि बोटींचा वापर केलाय.' कोरी वॉटसन म्हणाले, बळींमध्ये कमीतकमी सहा मुलं आहेत आणि बचाव पथक अधिक भागात पोहोचल्यामुळं एकूण मृतांची संख्या दुप्पट होऊ शकते. मृतांमध्ये नॉट काउंटीमधील एकाच कुटुंबातील चार मुलांचा समावेश आहे.

America Flood News
Jammu Kashmir : बारामुल्लामध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()