मे 2022 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दहशतवादी गटाचा मुकाबला करण्यासाठी या प्रदेशात अमेरिकन सैन्य पुन्हा तैनात करण्याच्या पेंटागॉनच्या विनंतीला मान्यता दिली.
US Strike In Somalia : सोमालीच्या गलकाडजवळ अमेरिकेच्या लष्करी (American Army) हल्ल्यात सुमारे 30 इस्लामी अल-शबाब (Islamist al-Shabaab) सैनिक ठार झाले.
यूएस आफ्रिका कमांडनं (US Africa Command) एका निवेदनात म्हटलंय की, लष्कर आणि लढवय्यांमध्ये जोरदार युद्ध झालं. हा हल्ला सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून 260 किमी ईशान्येकडं असलेल्या गलकाडजवळ झाला. यूएस आफ्रिका कमांडनं सांगितलं की, हल्ल्यात कोणीही नागरिक जखमी किंवा ठार झाले नाहीत.
अमेरिकन सैन्यानं सोमालिया नॅशनल आर्मीच्या (Somalia National Army) समर्थनार्थ सामूहिक स्व-संरक्षण हल्ला सुरू केलाय. जारी केलेल्या निवेदनात ही दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित असल्याचं म्हटलंय.
मे 2022 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दहशतवादी गटाचा मुकाबला करण्यासाठी या प्रदेशात अमेरिकन सैन्य पुन्हा तैनात करण्याच्या पेंटागॉनच्या विनंतीला मान्यता दिली. तेव्हापासून अमेरिकन सैन्य सोमाली सरकारला पाठिंबा देत आहे. दुसरीकडं, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020 मध्ये देशातून सर्व अमेरिकन सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन सैन्यानं अलीकडच्या काही महिन्यांत या भागात अनेक हल्ले केले आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात मोगादिशूच्या वायव्येस 218 किलोमीटर अंतरावर अल-शबाबचे दोन सदस्य ठार झाले. नोव्हेंबरमध्ये मोगादिशूच्या ईशान्येस सुमारे 285 किलोमीटर अंतरावर अल-शबाबचे 17 सैनिक ठार झाले, तर डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या दुसर्या हल्ल्यात राजधानीच्या ईशान्येस सुमारे 150 मैल अंतरावर असलेल्या कदेल शहराजवळ अल-शबाबचे सहा अतिरेकी ठार झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.