Peru Alien News : या जगामध्ये जर खऱ्या अर्थाने सर्वात मोठं गुढ जर कोणतं असेल तर ते म्हणजे 'एलियन्स'चं. एलियन्स आहेत की नाही? याबाबत मत मतांतर आहेत. काहींच्या मते एलियन ही संकल्पना एक अफवा आहे. ते काहींच्या मते एलियन्स अस्तित्वात आहेत. एलियन्स बाबत आजवर कित्येक वेळा वाद विवाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मात्र एलियन बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पेरू देशातील एका गावामध्ये लोकांनी एलियन पाहिल्याचा दावा केला आहे. यावेळी एका सात फुट एलियनने त्यांच्यावर हल्ला केल्याचे त्यांचे मत आहे. याचबरोबर स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे की, बंदुकीच्या गोळ्यांचा संबंधित एलियन वर वर्षाव केला असता त्यावर काहीही परिणाम होत नव्हता. कारण त्याला एक चिलखत होते. (bullet proof jacket)
यामुळे घडलेल्या या घटनेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काही लोकांनी याची तुलना अंधश्रद्धेशी केली आहे.या बाबत पोलिस अधिकार्यांच्या मते बेकायदेशीर सोन्याचे उत्खनन या गुन्ह्याशिवाय यात दुसरा कोणताही पैलू नाहीये. आम्हाला यात एलियन्सचा संशय नाहीये. ब्राझीलच्या 'ओ प्राइमरो कोमांडो द कॅपिटल' आणि कोलंबियाच्या 'क्लॅन डेल गॉल्फो', सारख्या ड्रग कार्टेलशी हे प्रकरण जोडले गेले असावेत असा दावा त्यांनी केला आहे. सोन्याचे संबंधित "माफिया" या हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत.
सरकारी वकिलांनी सांगितले की, सोने माफिया दहशत पसरवून पेरूमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पेरूमधील नानय नदीच्या आसपासच्या जंगलात सोने शोधण्यासाठी जेटपॅकचा वापर केला आहे.
याबाबत इकिटूचे नेते जैरो रेतेगुई यांनी सांगितले की, हल्लेखोर मानव नसून तो एक एलियन आहे. त्यावर दोनदा गोळी झाडण्यात आली. पण तो पडला नाही. तर तो तिथून गायब झाला. गावात जे चालले आहे. यामुळे सर्वांनाच भीती वाटत आहे.
त्याचबरोबर अजून एका साक्षीदाराने असे सांगितले की, एका शिक्षकांनी जमिनीवरून विचित्र प्राणी उडताना पाहिले. या प्रकरणाचा तपास करणारे सरकारी वकील सांगत आहेत की, हल्लेखोर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम करत आहे. अमर उजाला या वृत्त संस्थने हे वृत्त प्रकाशित केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.