वॉशिंग्टन : अमेरिकन महिला पुरुषांसोबत सेक्स न करण्याची (Physical Relationship) धमकी देत आहेत. ते ‘सेक्स स्ट्राइक’बद्दल बोलत आहेत. अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या गर्भपाताच्या निर्णयाला विरोध होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे महिलांचा गर्भपाताचा अधिकार संपुष्टात आला आहे. २६ राज्यांना गर्भपातावर बंदी घालण्याची परवानगी आहे. (American woman said, Physical Relationship will be formed only after getting the right to abortion)
गर्भपाताचा अधिकार फेडरल कायदा होईपर्यंत महिलांना पुरुषांसोबत लैंगिक संबंधांपासून दूर (Physical Relationship) राहण्यास सांगत आहे. सोशल मीडियावर देशभरात सेक्स स्ट्राइकची मागणी जोर धरू लागली आहे. ‘अमेरिकेच्या महिलांनो, ही शपथ घ्या, कारण आम्ही अनपेक्षित गर्भधारणा घेऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही कोणत्याही पुरुषाशी, अगदी आमच्या पतींसोबतही लैंगिक संबंध ठेवणार नाही. जोपर्यंत आम्हाला गर्भवती (abortion) व्हायची इच्छा नाही, असे ट्विटर युजरने लिहिले आहे.
मी न्यूयॉर्कमध्ये राहतो आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. मी अशा लोकांचा शोध घेत आहे जे सेक्स स्ट्राइकचे समर्थन करीत आहेत. हीच आमची ताकद आहे. जोपर्यंत गर्भपाताचा अधिकार फेडरल कायदा होत नाही तोपर्यंत सेक्स करू नका, असे आणखी एका युजरने सांगितले.
#SexStrike सोबत #abstinence देखील ट्विटरवर ट्रेंड करीत आहे. जोपर्यंत महिलांना गर्भपाताचा (abortion) अधिकार मिळत नाही तोपर्यंत त्यांनी पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवू नयेत, असे म्हणत आणखी एका महिलेने देशव्यापी सेक्स स्ट्राइकची मागणी केली.
महिला रस्त्यावर उतरल्या
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लोकही रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे. ॲरिझोना कॅपिटलच्या बाहेरील आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. गर्भपात विरोधी आंदोलकांनी सिनेट इमारतीच्या काचेच्या दारांना धक्के देण्यास सुरुवात केल्याने अधिकाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. निदर्शनामुळे खासदारांना काही काळ इमारतीच्या आत तळघरात राहावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.