ओटावा : भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी कॅनडामधील शीफ फुटीरतावाद्यांना लक्ष्य करत हिंसाचार आणि हेरगिरी करण्याचे आदेशच आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, असा आरोप कॅनडाच्या परराष्ट्र विभागाचे उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी बुधवारी केला आहे. हरदीपसिंग निज्जर या खलिस्तानवाद्याच्या हत्या प्रकरणी सबळ पुरावा नसल्याची कबुली पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी दिल्यानंतर कॅनडा सरकारने काही प्रमाणात नमते धोरण स्वीकारले होते. मात्र, आजच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.