UAE मध्ये सापडली तब्बल 8500 वर्षांपूर्वीची सर्वात जुनी इमारत

Ghagha Island
Ghagha Islandesakal
Updated on
Summary

घाघा बेटावर सापडलेली वास्तू गोल आकाराच्या खोल्यांसारखी असून याभोवती दगडी भिंत आहे.

दुबई : संयुक्त अरब अमिरातच्या (UAE) पुरातत्वशास्त्रज्ञांना देशातील सर्वात जुनी वास्तू सापडलीय. ही वास्तू 8500 वर्षे जुनी असल्याचं पुरातत्वशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ही इमारत पूर्वी सापडलेल्या इमारतीपेक्षा 500 वर्षे जुनी आहे. अबुधाबीच्या (Abu Dhabi) संस्कृती आणि पर्यटन विभागानं (Department of Culture and Tourism) या अद्भुत शोधाची माहिती दिलीय. अबुधाबी शहराच्या पश्चिमेला असलेल्या घाघा बेटावर (Ghagha Island) ही सर्वात जुनी वास्तू सापडल्याचंही त्यांनी सांगितलं.

घाघा बेटावर सापडलेली वास्तू गोल आकाराच्या खोल्यांसारखी असून याभोवती दगडी भिंत आहे. ही भिंत साधारण 3.3 फूट उंच असून अजूनही ती सुरक्षित आहे. संशोधकांच्या टीमनं सांगितलं की, ही रचना कदाचित; त्या वेळी बेटावर राहणाऱ्या एका लहान समुदायाचं घर होतं, असा अंदाज त्यांनी वर्तवलाय. या शोधावरून असंही दिसून येतंय की, लांब पल्ल्याचा सागरी व्यापार मार्ग सुरू होण्यापूर्वीपासून इथं एका विशिष्ट समुदायाचं वास्तव्य होतं, असं त्याचं म्हणणं आहे.

Ghagha Island
युद्ध अटळ? युक्रेनजवळ रशियाचे दीड लाख सैनिक तैनात, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचा दावा

जुन्या वास्तूत आढळला पुरलेला मृतदेह

या ठिकाणाहून हजारो पुरातन वास्तूही सापडल्या आहेत. यामध्ये दगडापासून बनवलेल्या बाणांचाही समावेश आहे. जे शिकार करण्यासाठी वापरले जात होते. या टीमनं सांगितलं की, इथं राहणाऱ्या लोकांनी समुद्रात सापडलेल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर केला असण्याचीही शक्यता आहे. तथापि, पुरातत्वशास्त्रज्ञांना अद्याप हे घर कधी वापरण्यात आलं याची खात्री नाही. सुमारे 5 हजार वर्षे जुन्या या इमारतीजवळ एक मृतदेह पुरलेला आढळून आलाय. अबूधाबी बेटावरील काही प्रसिद्ध थडग्यांपैकी हे एक आहे. संस्कृती विभागाचे अध्यक्ष मोहम्मद अल मुबारक (Mohammed Al Mubarak) म्हणाले, घाघा बेटावर सापडलेली वास्तू सर्वात जुनीय. याआधीची वास्तू अबूधाबीच्या किनार्‍याजवळ असणाऱ्या मारवाह बेटावर सापडली होती. तर, 2017 मध्ये जगातील सर्वात जुना मोतीही इथंच सापडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.