नवी दिल्ली- क्रूड ऑईल घेऊन भारताकडे येणाऱ्या जहाजावर येमनच्या हूथी बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. लाल समुद्रात भारतीय झेंडा लावलेल्या जहाजावर हा हल्ला करण्यात आला आहे. M/V साईबाबा या जहाजावर भारतीय क्रू मेंबर्स होते. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही. (An Indian flagged oil tanker hit by a one way attack drone fired by Yemen Houthi rebels in the Red Sea the US military)
शनिवारी भारतीय सागरी हद्दीमध्ये एका जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यासाठी अमेरिकेने इराणला जबाबदार धरले होते. त्यानंतर आता आणखी एका जहाजावर हल्ला झाला असल्याने चिंता वाढली आहे. लाल समुद्रातील जहाजावरील हल्ल्यानंतर अमेरिकेच्या नौसेनेला याबाबत संपर्क साधण्यात आला होता असं अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सांगितले. लाल समुद्रातील वाढल्या हल्ल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम पडण्याची शक्यता आहे.
हूथी बंडखोरांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यापैकी चार हल्ले हानून पाडण्यात आल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. तसेच १७ ऑक्टोंबर पासून लाल समुद्रात झालेला हा १५ वा हल्ला असल्याचं सांगण्यात आलं आहे. ७ नोव्हेंबरला इस्राइल-हमास युद्ध सुरु झाल्यापासून हूथी बंडखोरांच्या लाल समुद्रातील कारवाई वाढल्या आहेत. हूथी बंडखोरांना इराणचे पाठबळ मिळत आहे.
दरम्यान, हिंदी महासागरातील अरबी समुद्रात गुजरात किनाऱ्याजवळ एका केमिकल टँकरवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. यासंदर्भात इराणच्या ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने सांगितलं आहे. या जहाजामध्ये २० भारतीय क्रू मेंबर्स होते. एमवी केम प्लूटो जहाजावर लाईबेरियाचा झेंडा लावला होता. जहाजाची मालकी जपानी कंपनीकडे होती. कर्नाटकच्या बंदरावर हे जहाज उतरणार होतं. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.