गझनीच्या कबरीला तालिबानी नेत्याची भेट; 'सोमनाथ'वरील हल्ल्याचा कौतुकाने उल्लेख

गझनीच्या कबरीला तालिबानी नेत्याची भेट; 'सोमनाथ'वरील हल्ल्याचा कौतुकाने उल्लेख
Updated on

नवी दिल्ली : तालिबानला अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर येऊन दिड महिन्याहून अधिक काळ झाला आहे. सध्याची सत्ता ही आधीच्या सत्तेसारखी असणार नाही, अशी ग्वाही तालिबानने दिली होती मात्र, आता तालिबानने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. तालिबानचा प्रमुख नेता अस हक्कानी काल मंगळवारी महमूद गझनीच्या कबर पाहण्यास गेला होता. त्या ठिकाणी त्याने गझनवीचं मोठं कौतुक केलंय. इथवर ठिक होतं मात्र, त्याने सोमनाथ मंदिर तोडले गेल्याचा देखील फुशारकीने उल्लेख केला आहे. यासंदर्भात त्याने ट्विट देखील केलं आहे.

गझनीच्या कबरीला तालिबानी नेत्याची भेट; 'सोमनाथ'वरील हल्ल्याचा कौतुकाने उल्लेख
Lakhimpur Kheri violence: लखीमपूरला जाणारच, राहुल गांधींचा निर्धार

त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, आज मी महमूद गझनीच्या कबरला भेट दिली. तो 10 व्या शतकातील एक सुप्रसिद्ध असा मुस्लिम योद्धा आणि मुजाहिद होता. गझनीने गझनीपासून मुस्लिमांचे शासन प्रस्थापित केले तसेच त्यांने सोमनाथाची मूर्ती देखील उद्ध्वस्त केली होती.

महमूद गझनीने गुजरातमधील सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केलं होतं. त्याने भारतावर 17 वेळा आक्रमण केलं होतं. त्याच्या दरग्याला भेट देण्यासाठी अनस हक्कानी गेला होता. त्या ठिकाणी जाऊन त्याने मोठी फुशारकी मारत सोमनाथ मंदिर तोडण्याचा उल्लेख केला.

गझनीच्या कबरीला तालिबानी नेत्याची भेट; 'सोमनाथ'वरील हल्ल्याचा कौतुकाने उल्लेख
मॉस्को : चित्रीकरणासाठी अवकाशात उड्डाण

1026 मध्ये झाला होता मंदिरावर हल्ला

इ.स. १०२६ च्या मध्याला महमूद सोमनाथ येथे आला होता. त्यावेळी सोमनाथ नगराच्या रक्षणाची काहीच व्यवस्था नव्हती. सोमनाथची लढाई फक्त तीन दिवस चालली. पहिल्या दोन दिवशी नगराच्या रक्षकांनी निकराचा विरोध केला आणि तिसऱ्या दिवशी हजारो हिंदू लढवय्यांनी महमूदच्या सेनेला घेराव घातला परंतु योग्य संघटनेच्या अभावी लढाईत महमूदचा विजय झाला. सोमनाथनगर आणि मंदिराच्या आसपास सुमारे पन्नास हजार हिंदू कामी आले. विजयानंतर महमूदच्या सैनिकांनी मंदिर आणि नगराची लुटालूट करून तेथील रहिवाशांची हत्या केली. असा हा राजा अतिशय क्रुर व कपटी होता. या मंदिराला उद्ध्वस्त करण्यासाठी गझनीने जवळपास 5 हजार साथीदारांसमवेत हल्ला केला होता. याचा उल्लेख अरब प्रवासी अल-बरुनीच्या प्रवास वर्णनामध्ये आढळून येतो. गझनीने या हल्ल्यानंतर मंदिरातील मोठी संपत्तीची लयलूट केली होती. सोमनाथ मंदिरावर याआधी आणि नंतरही अनेकवेळा हल्ले झाले होते. मात्र, प्रत्येकवेळी त्याचा पुनर्निमाण करण्यात आलं. वल्लभभाई पटेलांनी शेवटच्या पुनर्निमाणाचा आदेश दिला होता. सध्या पंतप्रधान मोदी या श्री सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.