काय सांगता! इस्राईलमध्ये सापडले तब्बल 2500 वर्षांपूर्वीचे 'हेल्मेट'; ग्रीक-पर्शियन युद्धात सैनिकांनी केले होते परिधान

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

सातारा : आयएएच्या (IAA) माहितीनुसार, 2500 वर्षांपूर्वीचे हे जुने हेल्मेट डच जहाजाला (Dutch ship) 2007 मध्ये सापडले होते आणि त्याला इस्त्राईल अॅंटीक्विटीज अॅथॉरिटी (IAA) सागरी युनिटकडे देण्यात आले होते.

पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, हे हेल्मेट खूपच लोकप्रिय असून याचा भूमध्यसागरीय भागात वापर करण्यात आला होता. तसेच हे 'हेल्मेट' करिंथियनचा (Corinthian) प्रकार असून ज्याचे नाव ग्रीसमधील करिंथ (Corinth) शहराच्या नावाशी जोडले असावे, असा अंदाज आहे. 6 व्या शतकात प्रथम हे हेल्मेट विकसित करण्यात आले होते.

तुम्हाला माहितीय? 15 व्या शतकातील चीनी कलाकृतीच्या Porcelain Bowl ची किंमत $500,000 डॉलर्स इतकी आहे!

या हेल्मेटला पितळेच्या एकाच साच्यात गरम करुन त्यावरती हातोड्याचा घाव घालून बनविण्यात आले होते, जेणे करुन ते फार काळ टिकू शकेल. या तंत्राने एखाद्या योद्धाच्या मस्तकाच्या संरक्षणाची क्षमता कमी न करता त्याचे वजन देखील जेमतेम ठेवण्यात आले होते. कारण, युध्दावेळी या हेल्मेटची फारशी अडचण निर्माण होणार नाही, असा विचार त्यावेळी केला गेला असावा.

आयएए सागरी युनिटचे संचालक कोबी शर्वित (Kobi Sharvit) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की हे प्राचीन हेल्मेट बहुधा ग्रीक सैन्याच्या एका युद्धनौकेवर तैनात असलेल्या ग्रीसच्या ताफ्यातील सैन्याने वापरले असावे, त्यावेळी त्यांनी देशावर राज्य करणाऱ्या पारसी लोकांविरूद्ध नौदल संघर्षात भाग घेतला होता. तेव्हाचा या हेल्मेटचा वापर झाला असावा.

स्वीडनमध्ये 1300 वर्षांपूर्वीच्या रहस्यमय गोष्टीचा शोध; Gold Foil मध्ये दिसली मिठी मारणारी जोडपी

ग्रीक-पर्शियन युद्धे (Greek-Persian wars)

योद्धे समुद्रात गस्त घालत असताना पर्शियाने मध्य-पूर्वेकडे पसरलेल्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवले. तद्नंतर पर्शियन लोकांनी ग्रीसवर दोनदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पहिले आक्रमण 490 B.C मध्ये रोखले गेले होते, जेव्हा मॅरेथॉनच्या युद्धात अथेन्सजवळ (Athens) पर्शियन लोकांचा पराभव झाला होता. मॅरेथॉन शर्यतींचे नाव एका मॅरेथॉनच्या लढाईनंतर घडलेल्या कल्पित घटनेनंतर करण्यात आले. जेव्हा ग्रीसच्या विजयाची बातमी सांगण्यासाठी फिडीपीपाईड्स (Pheidippides) नावाचा एक सैनिक सुमारे 25 मैल (40 किमी) अंतरावर असलेल्या अथेन्स येथे पळाला. मात्र, ही आनंदाची बातमी दिल्यानंतर, फिडीपीपाईड्स थकव्यामुळे मरण पावला.

दुसर्‍या आक्रमणादरम्यान, इ.स 480 मध्ये थर्मोपायलेच्या (Thermopylae) लढाईत स्पार्टनच्या (Spartan) नेतृत्वाखालील पर्शियन लोक कमी झाले. त्यांना 479 मध्ये जबरदस्तीने ग्रीसमधून बाहेर काढले गेले. थर्मोपायलेची लढाई विशेषत: 300 स्पार्टनचे सैन्य म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याच्या नेतृत्वात स्पार्टनचा राजा लियोनिदास (Leonidas) होता, ज्याने पर्शियन लोकांविरूद्ध मृत्यूशी लढा दिला.

पुण्यात खोदकामात सापडली 1835 च्या काळातील सोन्याची नाणी; 216 नाण्यांनी उजळली साताऱ्याची तिजोरी

इ. स 479 नंतरच्या दशकांत ग्रीक लोक आक्रमक झाले आणि त्यांनी पूर्व भूमध्य भागात पर्शियांवर हल्ले सुरू केले. त्यापैकीच एका हल्ल्यात सहभागी ग्रीक सैनिकांनी हेल्मेट घातले असावे. 330 मध्ये अलेक्झांडर द ग्रेटने पर्शियन साम्राज्य जिंकल्यानंतही ग्रीक आणि पारसी लोकांमधील वैमनस्य सुरूच होते, असेही नमूद केले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.