USA Indian Student Death: अमेरिकेच्या ओहायोत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; आठवड्याभरातील तिसरी घटना

आठवड्याभरात अमेरिकेतील विविध भागात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
Breaking News
Breaking News Sakal
Updated on

न्यूयॉर्क : अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यावेळी ओहियो प्रातांतील सिनसिनाटी इथं हा प्रकार घडला आहे. आठवड्याभरातील ही तिसरी घटना आहे. पण विद्यार्थ्याचा मृत्यू कशामुळं झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. (another Indian student dies in Ohio USA third incident in a week)

Breaking News
Mumbai Blast Threat Message: मुंबईतील सहा ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी! पोलिसांना आलेल्या मेसेजमुळं खळबळ

श्रेयस रेड्डी असं अमेरिकेत मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचं नाव असून तो लिंडर स्कूल ऑफ बिझनेस या शैक्षणिक संस्थेत शिकत होता. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही पण यामध्ये प्राथमिकदृष्ट्यातरी संशयास्पद काहीही वाटत नसल्याचं भारतीय वाणिज्य दुतावासानं स्पष्ट केलं आहे. (Latest Marathi News)

Breaking News
Mumbai Crime : नऊ दिवसांच्या मुलीचा मृतदेह खड्ड्यात पुरला; मुंबईतल्या चारकोप पोलिसांच्या हद्दीतील घटना, वडील अटकेत

न्यूयॉर्कमधील भारताच्या दुतावासाकडून गुरुवारी सांगण्यात आलं की या प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी केली जात आहे. सध्यातरी याप्रकरणात कुठलीही संशास्पद घटना वाटत नाही. यासंदर्भात माहिती देताना दुतावासानं ट्विट करत सांगितलं की, ओहियोत भारतीय वंशाचा विद्यार्थी श्रेयस रेड्डी बेनिगिरी याच्या निधनामुळं मोठं दुःख झालं आहे. (Marathi Tajya Batmya)

Breaking News
Weight Loss journey : वजन कमी करायचे आहे? मग, आहारात समाविष्ट करा ‘हे’ झीरो कॅलरीज फूड्स

कुटुंबाला घटनेबाबत दिली माहिती

दुतावासानं या घटनेबाबत श्रेयस रेड्डीच्या कुटुंबियांना माहिती दिली असून सातत्यानं त्यांच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांना शक्य ते सर्व सहकार्य केलं जात आहे. भारतात बेनिगेरीच्या कुटुंबियांना याप्रकरणी याची माहिती दिली असून त्याचे वडील लवकरच भारतातून अमेरिकेत दाखल होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. (Latest Maharashtra News)

Breaking News
Pune : अमळनेरला होणार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

सातत्यानं भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना

२५ वर्षीय भारतीय विद्यार्थी विवेक सैनी याच्यावर नुकतीच जॉर्जिया राज्यातील लिथोनिया शहरात ज्युलियन फॉकनरद्वारे जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यापूर्वी इलिनोइस विद्यापीठात अर्बाना शँपेनमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थी अकुल बी धवन याची गेल्या महिन्यात हायपोथर्मियामुळं मृत्यू झाला होता. २० जानेवारी रोजी धवन बेपत्ता झाला होता. त्यानंतर सुमारे १० तासांनंतर त्याचा मृतदेह उरबाना विद्यापीठाच्या परिसरातील एका इमारतीत आढळून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.