Indian Students In US: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, महिन्याभरानंतर सापडला मृतदेह

Students In US: निनावी फोन करणाऱ्याने, "आराफातच्या कुटुंबियांना धमकी दिली की, त्याने त्यांच्या मुलाचे अपहरण केले असून, खंडणी मिळाली नाही तर त्याची किडनी विकू."
Mohammed Abdul Arfath
Mohammed Abdul ArfathEsakal
Updated on

Mohammed Abdul Arfath Indian Student In US:

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. अलिकडिल काळात अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत.

अशात आता याचप्रकरची आणखी एक घटना समोर आली आहे. 7 मार्च रोजी अमेरिकेतील ओहिओ येथील क्लीव्हलँड विद्यापीठात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये मार्स्टर्स डीग्रीचे शिक्षण घेणारा 25 वर्षांचा मोहम्मद अब्दूल अराफात बेपत्ता झाला होता. त्याचा मृत्यू झाला असून, मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे.

न्यूयॉर्कमधील भारताचे वाणिज्य दूतावासाच्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवरुन 7 मार्च रोजी ओहिओती क्लीव्हलँड विद्यापीठातून बेपत्ता झालेला हैदराबादमधील विद्यार्थी मोहम्मद अब्दूल अराफातच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे.

दूतावासाच्या @IndiainNewYork वरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ज्याच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती, तो मोहम्मद अब्दुल अरफात क्लीव्हलँड, ओहायो येथे मृतावस्थेत आढळला आहे. हे कळल्यावर दुःख झाले. मोहम्मद अरफात याच्या कुटुंबाप्रती आमची तीव्र संवेदना."

Mohammed Abdul Arfath
Viral Video: गळ्यात 7 चप्पलांचा हार अन् दारोदारी प्रचार, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

दूतावासाने पुढे म्हटले की, मोहम्मद अब्दुल अरफात याच्या मृत्यूची कसून चौकशी करण्यासाठी आम्ही स्थानिक तपास संस्थांच्या संपर्कात आहे. त्यांचे पार्थिव भारतात नेण्यासाठी आम्ही शोकाकूल कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहोत.

Mohammed Abdul Arfath
Liquor Policy Case : ‘आप’चे दुर्गेश पाठक यांची ईडी चौकशी

मूळचा हैदराबादचा असलेला आराफात 7 मार्चापासून क्लीव्हलँडमधून बेपत्ता झाला होता. पुढे मलकागिरी येथे असलेल्या आराफात याच्या कुटुंबियांना 12 हजार डॉलर्सची खंडणी मागणारा निनावी फोन आला होता. ज्यानंतर हे प्रकरण चिघळले होते.

निनावी फोन करणाऱ्याने, "आराफातच्या कुटुंबियांना धमकी दिली की, त्याने त्यांच्या मुलाचे अपहरण केले असून, खंडणी मिळाली नाही तर त्याची किडनी विकू."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.