Anti India Activities:कॅनडात खलिस्तानवाद्यांचा कडवा भारत विरोध सुरुच! भगवतगीता पार्कमध्ये धार्मिक चिन्हांची तोडफोड

Khalistani activities :खलिस्तानी फुटीरतावाद्यांकडून भगवतगीता पार्कमध्ये हिंदू धर्माच्या चिन्हांची तोडफोड, याआधी नरेंद्र मोदींचाही अपमान करण्यात आला होता.
Amritpal Singh Khalistani
Amritpal Singh KhalistaniSakal
Updated on

Khalistani Activity in Canada: कॅनडामध्ये सध्या फुटीरतावादी लोकांच्या हालचालींना वेग आला आहे. या लोकांकडून भारताविरोधी घोषणा केल्या जातात आणि भारतीय झेंड्याचा सार्वजनिकरित्या अपमानही केला जातो.

अशातच, कॅनडा देशातील ग्रेटर टोरंटो भागातील ब्रॅंपटन शहरात श्री भगवत गीता पार्कमध्ये लावण्यात आलेल्या संकेत चिन्हांची काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली.

वर्षभरात अनेक वेळा अशा अपमानकारक गोष्टींचा हा एक भाग आहे. शुक्रवारी (दि. १४ जुलै) सकाळी या चिन्हांची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करणारं एक भिंतीचित्र काढण्यात आले होते.

मात्र, सफाई कर्मचाऱ्यांकडून लगेच भिंतीचित्र हटण्यात आले आणि त्या मुळ चिंन्हांना त्याच्या आधीच्या ठिकाणी लावण्यात आलं.

Amritpal Singh Khalistani
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी बोलावलेली बैठक संपताच सुनिल राऊत म्हणाले, आता आम्हांला...

कॅनडामध्ये मागील उन्हाळ्यापासून सुरु झालेल्या या अपमान सत्राची ही एक ताजी घटना आहे. याआधी हिंदू धर्माची मंदिरे आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना देखील करण्यात आली होती.(Latest Marathi News)

ब्रॅंपटन शहराच्या ट्विटर हॅंडलवरुन ट्वीट करण्यात आलंय की, "पार्कमधील संकेत चिन्हांचा अपमान झाल्याची बातमी पाहून निराशा झाली.हा एका धार्मिक समुदायावर झालेला हल्ला आहे."

Amritpal Singh Khalistani
Ajit Pawar: सिल्वर ओकवर अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळेंची भेट; काय झाली चर्चा?

ट्वीटमध्ये सांगण्यात आलंय की पील भागातील पोलिसांना पाठवण्यात आलंय. याआधी या भागात झालेल्या अनेक घटनांचे कोडे अद्यापही सुटलेले नाहीत. या प्रकरणांमध्ये एकालाही अटक करण्यात आलेली नाही. (Latest Marathi News)

ब्रॅंपटन शहरातमध्ये आम्ही असहिष्णूता आणि भेदभावाच्या कृत्याविरोधात आम्ही एकत्र आहोत. आम्ही विविधता, सर्वसमावेशकता आणि सर्वांबद्दल आदर या मूल्यांवर नेहमी ठाम आहोत आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या अशा घटनांना अजिबात सहन केले जाणार नाही.

Amritpal Singh Khalistani
Maharashtra Politics Update : देवेंद्र फडणवीस रात्री मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी; राजकारणात पुन्हा नवा ट्वीस्ट?

ब्रॅंपटन शहराचे महापौर पॅट्रीक ब्राऊन यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की या तोडफोडीमुळे ते नाराज आहेत. शहरात कोणत्याही धार्मिक समुदायाला घाबरवणे आणि धमकावण्याच्या घटनांबद्दल सहिष्णूता दाखवली जाणार नाही. कॅनडामधील भारतीय लोकांनी देखील या घटनेबद्दल आपला राग व्यक्त केला.

मागच्या वर्षीतील जुलै महिन्यापासून कॅनडामधील हिंदू मंदिरांना अपवित्र करण्याच्या कमीत कमी सहा घटना घडल्या आहेत. या साखळीतील ताजी घटना म्हणजे ७ जुलैला ब्रॅंपटन शहरामध्ये भारत माता मंदिराबाहेर भारतीय राजदूतांना लक्ष्य करत काही पोस्टर्स लावण्यात आले होते. मागच्या चार घटनांमध्ये स्प्रेपेंटने खलिस्तान्यांच्या समर्थनार्थ नारे लिहिण्यात आले होते.

Amritpal Singh Khalistani
Pakistan Bankruptcy:पाकिस्तानची ऋण काढून सण करायची सवय जाता जाईना, कर्जाच्या पैशाने फडकवणार आशिया खंडातील सर्वात उंच झेंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.