'अपहरण करुन डोमिनिकाला आणलं'; मेहुल चोक्सीच्या वकीलांनी दिली आरोपींचीही नावे

'अपहरण करुन डोमिनिकाला आणलं'; मेहुल चोक्सीच्या वकीलांनी दिली आरोपींचीही नावे
Updated on

नवी दिल्ली: पीएनबी घोटाळ्यातील (PNB scam) आरोपी असलेल्या फरार मेहुल चोक्सीच्या अपहरणाबाबत आता अँटिगाच्या रॉयल पोलिस फोर्सने देखील तपास सुरु केला आहे. डोमिनकाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी सांगितलंय की, चोक्सीच्या (Mehul Choksi) वकीलांच्या तक्रारीनंतर अँटिगा आणि बारबूडाच्या रॉयल पोलिस फोर्सने अपहरणप्रकरणी तपास सुरु केला आहे. पंतप्रधान ब्राउन (PM Gaston Browne) यांनी हे देखील सांगितलं की, चोक्सीच्या वकीलांनी या अपहरणामध्ये सामील असणाऱ्या आरोपींची नावे देखील दिली आहेत. अँटिगामधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस्टन ब्राउन यांनी सांगितलंय की, मेहुल चोक्सीच्या वकीलांनी पोलिस कमिशनर यांना आपल्या तक्रारीमध्ये त्या लोकांची देखील नावे सोपवली आहेत ज्यांनी चोक्सीचं अपहरण केलं होतं. ब्राउन यांनी हे देखील म्हटलंय की, जर या दाव्यांमध्ये काही सत्य असेल तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे. त्यांनी म्हटलंय की, पोलिस या तक्रारींना गांभीर्याने घेत आहे. (Antigua police started investigating Mehul Choksi abduction PM Gaston Browne)

'अपहरण करुन डोमिनिकाला आणलं'; मेहुल चोक्सीच्या वकीलांनी दिली आरोपींचीही नावे
'भारतासोबतचे गैरसजम दूर झाले'; नेपाळच्या पंतप्रधानांना मैत्रीची आठवण

पंतप्रधान ब्राउन यांनी म्हटलं की, चोक्सीने अँटिगा आणि बारबूडाच्या रॉयल पोलिस फोर्सकडे आपल्या अपहरणाबाबत तक्रार दाखल केली आहे. त्याने आपल्या वकिलांमार्फत औपचारिक पद्धतीने तक्रार दाखल करुन म्हटलंय की, त्याला अँटिगातून अपहरण करुन डोमिनिकाला नेण्यात आलं होतं. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं असून त्यांनी या अपहरणासंदर्भात तपास सुरु केला आहे. डोमिनिकामधील विरोधी पक्षाचे नेते लेनक्स लिंटन यांनी दावा केला आहे की, चोक्सीला जहाजातून 23 मेच्या रात्री डोमिनिकाला आणलं गेलं होतं. चोक्सीच्या परिवाराने दावा केला आहे की, तो 23 मेच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अँटिगामध्येच होता. अशा परिस्थितीत 120 मैलाचा प्रवास फक्त 4 ते 5 तासांत पार करणे अशक्यप्राय आहे. तर कस्टम डॉक्युमेंट्समधील माहितीनुसार, 23 मेच्या सकाळी 10 वाजता एक नाव अँटिगामधून निघाली होती. तर चोक्सीच्या घरी का करणाऱ्या नोकरांचं म्हणणं आहे की, तो सायंकाळी 5 वाजेपर्यंत घरीच होता. यावरून असा एक दावा पुढे येतोय ज्यानुसार चोक्सीला त्या नावेमधून नेण्यात आले नव्हतं. हा दावा लिंटन करत आहेत.

'अपहरण करुन डोमिनिकाला आणलं'; मेहुल चोक्सीच्या वकीलांनी दिली आरोपींचीही नावे
कोरोनाचे नवीन रुग्ण एक लाख, दुसरी लाट ओसरली

चोक्सी 23 मे रोजी रहस्यमयी पद्धतीने अँटिगामधून बेपत्ता झाला होता. तो अँटिगामध्ये 2018 पासून त्या देशाचा नागरिक म्हणून राहतो आहे. त्याला शेजारील देश डोमिनाकामध्ये अवैध प्रवेशाच्या प्रकरणी पकडलं गेलंय. चोक्सीचे वकील असा दावा करत आहेत की, त्याला जॉली हार्बरमधून डोमिनिकाला अँटिगा आणि भारताच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नावामधून घेऊन गेले होते. या दरम्यानच, चोक्सीची डोमिनिकातील मॅसिस्ट्रेट कोर्टात सुनावणी झाली, ज्याठिकाणी त्याच्या जामीन अर्जास केराची टोपली दाखवण्यात आली आहे. डोमिनिकाच्या कोर्टाने चोक्सीची हेबल कॉर्पस अर्थात बंदी प्रत्यक्षीकरणाच्या याचिकेवरील सुनावणी देखील टाळली आहे. चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे दोघेही भारतामधील साडेतेरा हजार कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.