यूएन’च्या सरचिटणीसपदी पुन्हा अँटोनिओ गुटेरेस

गुटेरेस यांची संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याचे ‘यूएनच्या आमसभेच्या ७५ व्या सत्राचे अध्यक्ष व्होल्कन बोझकीर यांनी जाहीर केले.
Antonio Guterres
Antonio GuterresSakal
Updated on

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) (United Nation) सरचिटणीसपदी (General Secretary) अँटोनिओ गुटेरेस (Antonio Guterres) (वय ७२) यांची फेरनिवड (Reselection) झाली. ‘यूएन’च्या सुरक्षा समितीत त्यांच्या नावाची एकमताने शिफारस केल्यानंतर शुक्रवारी (ता. १८) आमसभेत त्यांच्या फेरनियुक्तीची घोषणा झाली. गुटेरेस यांचा दुसरा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ पासून सुरुवात होणार आहे. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ते या पदावर असतील. (Antonio Guterres Reselection United Nation General Secretary)

गुटेरेस यांची संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याचे ‘यूएनच्या आमसभेच्या ७५ व्या सत्राचे अध्यक्ष व्होल्कन बोझकीर यांनी जाहीर केले. त्यानंतर त्यांनी गुटेरेस यांना पदाची शपथ दिली. ‘यूएन’मधील १५ देशांच्या सुरक्षा समितीच्या ८ जून रोजी झालेल्‍या गोपनीय बैठकीत गुटेरेस यांना पुढील पाच वर्षे मुदतवाढ देण्याचे ठराव मांडण्याचे ठरले होते. ‘यूएन’चे नववे सरचिटणीस म्हणून गुटेरेस यांनी १ जानेवारी २०१७ रोजी सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा हा कार्यकाळ यंदा ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. ते पोर्तुगालच माजी पंतप्रधान आहेत. जून २००५ ते डिसेंबर २०१५ अशी दहा वर्षे त्यांनी निर्वासितांसाठी ‘यूएन’चे उच्चाधिकारी म्हणून काम केले आहे. पोर्तुगाल सरकारने नामांकन केलेले गुटेरेस हे सरचिटणपदासाठी एकमेव अधिकृत उमेदवार होते.

Antonio Guterres
इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी इब्राहिम रईसींची निवड

भारताचा पाठिंबा

गुटेरेस यांच्या फेरनियुक्तीला भारतानेही पाठिंबा दिला होता. ‘यूएन’मधील भारताचे प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी गुटेरेस यांच्या नावाच्या शिफारशीच्या प्रस्तावाचे स्वागत ट्विटद्वारे केले होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुटेरेस यांची गेल्या महिन्यात ‘यूएन’च्या मुख्यालयात भेट घेऊन दुसऱ्या कार्यकाळासाठी भारताचा त्यांना पाठिंबा असल्याची ग्वाही दिली होती.

महिलांना २०२६ नंतरच संधी

‘यूएन’च्या ७५ वर्षांच्या इतिहासात अद्याप एकही महिला सरचिटणीस झालेली नाही आणि गुटेरेस यांच्या फेरनिवडीने या जागतिक संघटनेचे सारथ्य करण्याची संधी महिलांना २०२६ नंतरच मिळू शकणार आहे.

Antonio Guterres
पॉर्नहब विरोधात महिलांची कोर्टात धाव

‘सर्वांच्या चांगल्या भवितव्यासाठी काम करेन’

कोरोनाच्या जागतिक साथीतही सर्वांच्या चांगल्या भवितव्यासाठी काम करेन, अशी ग्वाही अँटोनिओ गुटेरेस यांनी यांनी ‘यूएन’च्या सरचिटणपदी फेरनिवड झाल्यानंतर दिली. हा स्मरणीय क्षण असून तुम्ही माझ्यावर दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल मी खूप आभारी व ऋणी आहे. ‘यूएन’ची सेवा करणे हा माझा सन्मान आहे, असे त्यांनी शपथ समारंभानंतर सांगितले. कोरोनाच्या साथीने आपली असुरक्षितता दिसली असून परस्पर संवाद आणि एकत्रित प्रयत्नाची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.