Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेनमधील युद्ध सुरूच राहील; अँटोनिओ गुटेरेस

अँटोनिओ गुटेरेस यांचे मत : शांतता चर्चा होण्याची शक्यता नाही
Antonio Guterres
Antonio GuterresSakal
Updated on

न्यूयॉर्क : ‘‘रशिया-युक्रेनमधील युद्ध यापुढेही सुरू राहणार आहे आणि नजीकच्या काळात या दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा होण्याची कोणतीही शक्यता वाटत नाही, असे संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी स्पष्ट केले. गुटेरेस यांची वर्षातील शेवटच्या पत्रकार परिषदे सोमवारी (ता.१९) झाली. ते म्हणाले, की युद्ध थांबविण्याबाबत भविष्यात गांभीर्याने शांतता चर्चा होईल, अशी मला आशा मला वाटत नाही. हा लष्करी संघर्ष चालूच राहील आणि शांततेसाठी गंभीर चर्चा होण्याच्या क्षणाची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. युक्रेनमध्ये अशा चर्चेसाठी काही मार्ग दिसतो का, असे विचारले असता गुटेरेस यांनी सध्या कोणताही मार्ग मला दिसत नसल्याचे सांगितले. म्हणूनच आम्ही अनेक प्रयत्न करीत असताना विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करीत आहोत.

उदा. ‘ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह’ या उपक्रमाची कार्यक्षमता वाढविणे, त्या उपक्रमात अमोनिया निर्यात, युद्धकैद्यांच्या देवाणघेवाण आदी नवीन घटक जोडण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण. शांतता करार न झाल्यास युक्रेनच्या लोकांवर, रशियन समाजावर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम त्यांनी नमूद केले. म्हणूनच हे युद्ध पुढील वर्षअखेरीपर्यंत थांबावे, अशी माझी प्रबळ इच्छा आहे. रशियाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर आक्रमण केले होते. दहा महिनांत उलटले असून अजूनही हल्ले सुरूच आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणे आवश्‍यक

ट्विटरचा चालक कोण आहे, याविषयी माझे वैयक्तिक काही मत नाही. पण या व्यासपीठाचे काम कसे चालते, द्वेषयुक्त भाषणांशी लढा देणे आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्य अबाधित ठेवण्यात विशेषतः पत्रकार आणि सोशल मीडियासंबंधी यात मला अधिक रस आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांचा धोका आहे का आणि ते ट्विटरमधून पायउतार होतील असे वाटते का, या प्रश्‍नावर गुटेरेस बोलत होते.

पुढील वर्षी हवामान परिषद

अतिमहत्त्वाकांक्षी नसलेली हवामानविषयक शिखर परिषद पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित करणार असल्याची घोषणा गुटेरेस यांनी आज केली. या परिषदेत देशांना त्यांच्या नव्या आणि विश्‍वासार्ह कृती आराखड्यासह सहभागी होता येईल. केवळ समर्थन देणाऱ्या, दोषांपासून पळणाऱ्या आणि पूर्वीच्या घोषणांची जंत्री नव्याने सादर करणाऱ्यांना या परिषदेत स्थान नसेल, असे ते म्हणाले.

‘व्हेटो’बाबत प्रश्‍नचिन्ह कायम

युक्रेन युद्धासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी ‘यूएन’ला अधिक मजबूत बनविण्‍यासाठी सुरक्षा समितीत बदल करण्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना गुटेरेस म्हणाले की, ‘‘सयुंक्त राष्ट्रां (यूएन)मधील सुरक्षा समितीच्या स्थायी सदस्यांची संख्या वाढवली जाऊ शकते. या मुद्द्यावर गंभीरपणे विचार सुरू आहे. पण ‘व्हेटो’च्या (नकाराधिकार) अधिकाराबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.