क्युपर्टिनो (अमेरिका) : आयफोन, आयपॅड आणि मॅक कॉम्प्युटरसाठी ‘लॉकडाऊन’ हा नवा पर्याय लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे ‘ॲपल’ कंपनीने जाहीर केले आहे. स्पायवेअरपासून ग्राहकांच्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरवरील माहितीचे संरक्षण व्हावे, यासाठी हा पर्याय तयार केला असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. अर्थात, लॉकडाऊन’चा वापर सुरु केल्यास संबंधित आयफोन अथवा आयपॅडचे काही फिचर वापरता येणार नाहीत.
‘ॲपल’ कंपनीने आजच्या या नव्या फिचरची घोषणा केली. सरकारपुरस्कृत हॅकर आणि व्यावसायिक स्पायवेअरपासून आपल्या ग्राहकांना संरक्षण मिळावे, असा यामागे हेतू असल्याचे कंपनीने सांगितले. मात्र त्यामुळे, जगातील सर्वांत सुरक्षित समजली जाणारी ‘ॲपल’ची उपकरणेही घुसखोरीपासून संरक्षित नाहीत, हेच एकप्रकारे दिसून येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पत्रकार, राजकीय विरोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठी काही देश स्पायवेअरचा वापर करत असल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत समोर आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत उपयोग
‘लॉकडाऊन मोड’ असे ‘ॲपल’च्या नव्या फिचरचे नाव असेल. सुरुवातीला चाचणी करण्यासाठी ते मर्यादित प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार आहे. ‘ॲपल’ने आपल्या उपकरणांमध्ये अनेक सुरक्षेचे उपाय केले आहेत. नवीन ‘लॉकडाऊन मोड’ हे फिचर आपत्कालीन बटन म्हणून काम करणार असल्याचे सांगितले जाते. आपल्या मोबाईलवर स्पायवेअरचा हल्ला झाला असल्याचे लक्षात येताच माहिती वाचविण्यासाठीचा अंतिम उपाय म्हणून या फिचरचा वापर करता येणार आहे. हे फिचत ॲक्टिव्हेट केल्यानंतर इतर काही महत्त्वाची सेवा आपोआप बंद होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.