Apple ने पुन्हा 'वर्क फ्रॉम होम' वाढवले; आता कर्मचाऱ्यांना देणार बोनस

Apple
Applegoogle
Updated on

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा (Omicron) धोका लक्षात घेता Apple ने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्यासाठी (Corporate Return to the Office) दिलेली अंतीम मुदत रद्द केली आहे. Apple ने कॉर्पोरेट ऑफिसमध्ये परत येण्याची अंतिम मुदत मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, Apple ने आपल्या कर्मचार्‍यांना 1 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयात परत येण्यास सांगितले होते. यासोबतच कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी (Work From Home) कंपनीने तब्बल $1,000 चा बोनस देखील जाहीर केला आहे.

ब्लूमबर्ग न्यूजनुसार, क्युपर्टिनो, कॅलिफोर्नियास्थित कंपनी अॅपलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालये उघडण्याची अंतिम मुदत ओलांडली आहे. ऍपलने आपल्या रिटर्न ऑफ ऑफिस प्लॅन अनेक वेळा बदलला आहे. अॅपलने यापूर्वी जून, नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, जानेवारी आणि त्यानंतर 1 फेब्रुवारीपासून कार्यालय सुरू केले जाईल, असे सांगितले होते.

आता Apple Inc ने पुन्हा एकदा त्यांची 'कॉर्पोरेट रिटर्न-टू-ऑफिस'ची अंतिम मुदत (तारीख अद्याप निश्चित केलेली नाही) 1 फेब्रुवारीपासून पुढे वाढवली आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांनी पाठवलेल्या मेमोद्वारे बुधवारी कर्मचाऱ्यांना या बद्दल माहिती देण्यात आली. Apple च्या प्रवक्त्याने ब्लूमबर्ग न्यूजला या निर्णयाबद्दल सांगीतले.

सुमारे आठवडाभरापूर्वी कंपनीने कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपर्यंत परत येण्यास सांगितले होते, आता पुन्हा एकदा ही मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र, पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. कोरोनामुळे अनेक कंपन्यांना त्यांची कामे सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत. टेक जायंट मायक्रोसॉफ्ट कॉर्पने देखील सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यासाठी दिलेली अंतिम तारीख रद्द केली होती. कुक यांनी असेही म्हटले आहे की, क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया-येथे असलेली कंपनी प्रत्येक कर्मचार्‍याला $1,000 बोनस देईल ज्याचा वापर घरातून कामासाठी करता येईल.

Apple
Jio चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन; फक्त 1 रुपयात 30 दिवस व्हॅलिडिटी

गेल्या वर्षी कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या सुरूवातीच्या काळात Apple आपल्या कर्मचार्‍यांना घरातून काम करण्यास परवानगी देणारी पहिली यूएस कंपनी होती. त्याचवेळी त्यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑफिस सुरू करण्याची तयारी केली होती. त्यानंतर, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तो निर्णय एक महिना ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला, त्यानंतर पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत ते पुढे ढकलण्यात आले आणि आता त्यात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे.

Apple
जगातील सर्वाधिक प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत PM मोदी आठवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.