ज्यानं जगाला हसवलं, त्या 'श्लितजी'ला पालकांनी घराबाहेर हाकललं

Schlitzie
SchlitzieGoogle
Updated on

सातारा : 'सर्कस' (Circus) हा शब्दच जादूई आहे. तीन तास चालणारे खेळ, रंगांची रेलचेल हे सारं फक्त त्या स्टेजवर घडत नाही, तर ते तुमच्या आत कुठंतरी घडतं. आपलं आयुष्य आपण जादूई करायला हवं. ‘मेरा नाम जोकर’मधला राज कपूर (Raj Kapoor) म्हणतो तसं.. ‘जिना यहॉं, मरना यहॉं, इसके सिवा जाना कहॉं..! सर्कशीतला सर्वात महत्वाचा घटक (कलाकार) म्हणजे 'जोकर'. आपलं दु:ख विसरुन तो इतरांना हसवत असतो. इतरांशी बोलत असतो, हावभावाव्दारे आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत असतो. अमेरिकेतील साईड शो (American Side Show) मधला प्रसिद्ध कलाकार श्लितजीच्या (Schlitzie) वाट्याला देखील मोठं दु:ख आलं होतं. मात्र, तो दुखी नव्हता. कारण, त्याला 'आयुष्य' कसं जगायचं याची देखील कल्पना नव्हती. त्याला एका भयंकर आजारानं ग्रासलं होतं. त्याच्या घरचे देखील त्याच्या बालबुध्दीमुळे वैतागले होते. वयानं मोठा असलेला श्लितजी बुध्दीनं मात्र फार कमी होता. त्याला कसं वागावं, कसं बोलावं याची कोणतीच कल्पना नव्हती. बस्स! तो शरीरानंच वाढत होता.. (Article On American Side Show Famous Artist Schlitzie)

Summary

आपलं आयुष्य आपण जादूई करायला हवं. ‘मेरा नाम जोकर’मधला राज कपूर म्हणतो तसं.. ‘जिना यहॉं, मरना यहॉं, इसके सिवा जाना कहॉं.!

श्लितजीचा (Schlitzie) जन्म 1 सप्टेंबर 1901 रोजी न्यूयॉर्कमधील ब्रॉस येथे एका श्रीमंत कुटुंबात झाला. तो लहानपणापासूनच मायक्रोसेफली (Microcephaly) नावाच्या आजारानं ग्रस्त होता. या आजाराच्या लोकांना पिनहेड (pinhead) देखील म्हटलं जातं. कमी उंची, डोकं लहान, चेहरा मोठा, तीन ते चार वर्ष वयाची बुद्धिमत्ता आणि अगदीच काही शब्द बोलण्याची क्षमता श्लितजीत होती. त्याच्या कुटुंबीयासमोर 'श्लितजी' ही मोठी समस्या होती. या पोराचं करायचं काय?, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना वारंवार पडत होता. खूप वेळा हाॅस्पिटल्समध्ये श्लितजीवर उपचार करण्यात आले. मात्र, त्याच्या आजारावर कोणतेच निदान झाले नाही. तो तसाच राहिला. शेवटी त्याच्या कुटुंबीयांनी टोकाचा निर्णय घेण्याचे ठरवले आणि त्याचा त्याग केला. शेवटपर्यंत त्याची बुद्धिमत्ता चार वर्षे वयाच्या मुला इतकीच होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना त्यांनी घेतलेला तो निर्णय योग्यच वाटला. श्लितजीला जन्मापासून छोटा मेंदू, छोटी कवटी आणि शरीरातील काही अवयव अपूर्ण, त्यामुळे त्याच्या सर्वांगावर याचा मोठा परिणाम झाला होता. तो इतरांपेक्षा खूपच वेगळा होता. त्याचं आयुष्यच वेगळं होतं.

Schlitzie
Schlitzie
Schlitzie
40 वर्षांत 27 वेळा गरोदर; तब्बल 69 मुलांना जन्म देणाऱ्या आईची 'गिनीज'मध्ये नोंद

श्लितजीला त्याच्या जन्मदात्यांनी घराबाहेर काढल्यानंतर त्याचे आयुष्य खूप बदले. मात्र, बुध्दीने त्याला कधीच साथ दिली नाही, तो पूर्वी होता तसाच राहिला. श्लितजीनं एक सर्कस जाॅइन केली. अनेक अमेरिकन इंटरनॅशनल सर्कसमध्ये (American International Circus) श्लितजी काम करु लागला. त्यात टॉम मिक्स सर्कस, रिंगलिंग ब्रदर्स आणि बारनम अँड बेली सर्कस यांचा समावेश होता. श्लितजी पुरुष असूनही स्टेजवर त्याचा परफॉर्मन्स स्त्रीचा असायचा. स्त्रिया घालतात तसा तिथला लॉन्ग स्कर्ट तो घालायचा आणि परफॉर्म करायचा. मात्र, त्याचा हा परफॉर्म लोकांना खूप आवडायचा. श्लितजीचे स्टेज शो जसे प्रसिद्ध होत गेले, तशी त्याला एका फिल्मची ऑफर देखील मिळाली. त्या सिनेमाचं नाव होतं 'फ्रीक्स'. 1932 मध्ये हा सिनेमा आला. यात प्रेमाची आणि त्याच्या विश्वासघाताची गोष्ट आहे. ती साईड शो'मध्ये देखील नेहमी अनुभवली जायची. साईड शो हा एक अमेरिकेतला मोठा उत्पादक बिजनेस. ज्यामध्ये सर्कस, परफॉर्मन्सेस, कार्निवल इत्यादी गोष्टी केल्या जायच्या. त्या सगळ्या वरतीच आधारित होता फ्रिक्स. त्यामध्ये साईड शो मधल्या कलाकारांचे जीवनच दाखवण्यात आलं होतं. मात्र, या सिनेमाला सुरुवातीपासूनच विरोध करण्यात आला. यातील घृणास्पद लैंगिक सीनवर अनेकांनी टीकेची झोड उठली होती. मात्र, या सगळ्यात श्लितजीने साकारलेली निरागस भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Schlitzie
Schlitzie
Schlitzie
पॅलेस्टाइननंतर सीरियामध्ये इस्रायलचा मोठा AIR STRIKE

1936 मध्ये टॉम मिक्स सर्कस मधले ट्रेनर जॉर्ज सूर्ट्टीस हे त्याचे कायदेशीर सल्लागार झाले. त्यांना नेहमीच श्लितजीविषयी लळा, आपुलकी वाटायची. त्यांनी त्याला पोटच्या पोरासारखं सांभाळलं, अगदी स्वतःच्या मृत्यूपर्यंत. 1965 मध्ये सूर्ट्टीस यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांची मुलगी त्यांची वारसदार ठरली. मात्र, तिला श्लितजीमध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता. त्याचं पुढं काय होईल याच्याशी तिला काहीच देणं-घेणं नव्हतं. तिनं श्लितजीला लॉस एंजलिस मधल्या एका मानसिक आरोग्य केंद्रात ठेवलं. श्लितजी तिकडे तीन-चार वर्ष एकटाच राहिला, त्याला कोणीच भेटायला देखील जात नव्हतं. पण, कधी-कधी नशीब साथ देतचं! एके दिवशी अचानक त्याच्या साईड शो मधला तलवारबाज ‘बिल उंक्स’ त्या मेंटल हाॅस्पिटलमध्ये काही सेवा देण्यासाठी आला होता. त्यानं श्लितजीला पाहिलं आणि त्याने लगेच त्या मेंटल हॉस्पिटलला विनंती केली. मी याला ओळखतो आणि मी याची काळजी घे घेईन, असं सांगितलं. हाॅस्पिटलनेही त्यास परवानगी दिली आणि श्लितजीने पुन्हा सर्कस जॉईन करण्याचा निर्णय घेतला. सर्कस हेच श्लितजीचं जीवन होतं आणि त्यातच तो सुख शोधत होता. मरणाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यानं सर्कशीलाच सर्वस्व मानलं. 1971 साली श्लितजीनं जगाचा निरोप घेतला.

Article On American Side Show Famous Artist Schlitzie

Schlitzie
Schlitzie

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.