अब्जावधी रुपयांच्या आलिशान गाड्यांनी भरलेले एक मालवाहू जहाज गुरुवारी अटलांटिक महासागरात (Atlantic Ocean) जळाले. त्यातील ४००० फोक्सवॅगन (Volkswagen car) कंपनीच्या कार, १८९ फोक्सवॅगन बेंटले (Bentleys) तर ११०० पोर्शे (Porsches) कार जळुन खाक झाल्यात. हे मालवाहू जहाज जर्मनीहुन अटलांटिक महासगरावाटे अमेरिकेत घेऊन जात होते. सुदैवाने जहाजावरील २२ क्रु मेम्बर्स बचावले आहे.
कोरोनामुळे आधीच वाहन उद्योगाची परीस्थिती नाजुक आहे. अशातच वाहन उद्योगावर आणखी एक मोठे संकट म्हणावे लागेल. अब्जावधी कोटींच्या कार जळाल्याने खुप मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना वाहन उद्योगाला करावा लागणार आहे.
फेलिसीटी एस नावाच्या या मालवाहू जहाजाला भर समुद्रात अचानक भीषण आग लागली. आग एवढी होती की जहाजावरील सर्व वाहने जाळून खाक झालेत. यात एक बेंटले कारची किंमत ३ कोटी रुपयांपासून पुढे आहे त्यामुळे ५०० ते ६०० कोटींच्या १८९ बेंटले कार जाळून खाक झाल्यात. ४००० फोक्सवॅगन कंपनीच्या कार जळाल्या तर त्यांची किंमत जवळपास २ ते ३ हजार कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जाते तर प्रत्येकी एक कोटींची किंमत असलेल्या ११०० पोर्शे कार जळाल्यात. सुदैवाने जहाजावरील २२ क्रु मेम्बर्स बचावले आहे.
या घटनेने २०१९ ला जलसमाधी मिळालेल्या एक मालवाहक जहाजाची आठवण करून दिली. त्यावेळी २००० लग्झरी कार असलेलं इटालियन मालवाहक जहाजाला अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली या घटनेत अरबो रुपयांच्या लग्झरी कार जहाजात होत्या, ज्या समुद्रात बुडाल्या होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.