"अश्रफ गनींनी देशाचा विश्वासघात केलाय, त्यांना माफी नाही"

दिल्लीत दाखल झालेल्या अफगाणी खासदारांनी कथन केली परिस्थिती
Afgani MPs
Afgani MPsANI
Updated on

नवी दिल्ली : आफगाणिस्तानीस्तानातील सरकारचा तालिबान्यांनी जवळपास पाडाव केला असून राजधानी काबूल आणि राष्ट्रपती भवनावरही कब्जा केला आहे. या घडामोडींदरम्यान अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी देशातून पळ काढत ताजिकस्तानात आश्रय घेतला आहे. तर इतर काही खासदार भारताच्या आश्रयाला आले आहेत. पण भारतात दाखल झाल्यानंतर एका माजी खासदारानं अश्रफ गनी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Afgani MPs
तालिबानी कमांडर्सनी घेतला अफगाण राष्ट्रपती भवनाचा ताबा

अफगाणिस्तानचे माजी खासदार आणि माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांचे पुतणे जमिल करझाई म्हणाले, "मी जेव्हा काबूल शहर सोडलं त्यानंतर तालिबाननं त्यावर कब्जा केला. मला वाटतं आता तिथं नवं सरकार स्थापन होईल. पण देशात जे काही घडलं ते अश्रफ गनी यांच्यामुळेच घडलं आहे. त्यांनी अफगाणिस्तानचा विश्वासघात केला असून लोक त्यांना कधीही माफ करणार नाहीत."

अफगाण राष्ट्रपतींचे वरिष्ठ सल्लागार रिझवानुल्लाह अहमदझाई यांनी म्हटलं की, "अफगाणिस्तानातील बहुतेक ठिकाणी शांतात आहे. पण जवळपास सर्वच राजकीय व्यक्ती म्हणजेच मंत्र्यांनी काबूल सोडलं आहे. जवळपास २०० लोक भारतात आले आहेत. मला वाटतं हा नवा तालिबानी चेहरा असेल जो महिलांनाही कामधंदा करण्यास परवानगी देईल"

त्याचबरोबर, "मला देश सोडण्याची इच्छा नव्हती. मी भारतात बैठकीसाठी आलो आहे. मी पुन्हा अफगाणिस्तानला जाईल. पण त्याठिकाणी सध्याची स्थिती खरोखरच खूपच वाईट बनली आहे. विशेषतः आजची रात्र खूपच वाईट असेल," असं पाक्तिया प्रांताचे खासदार सईद हसन पक्तियावल यांनी म्हटलं आहे.

अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यामध्ये शांततेचा करार झाला होता. ती केवळ सुपूर्द करण्याची प्रक्रिया होती. सध्या काबूलमधील परिस्थिती शांत आहे. पाकिस्तान हा तालिबानचा एक समर्थक आहे. माझं कुटुंब अजूनही काबूलमध्ये आहे, अशी माहिती अफगाण खासदार अब्दुल कादिर झझाई यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर भारतीय माध्यमांशी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.