युरोपियन देश इटलीमध्ये पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. १८ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इटलीतील व्हेनिस शहरात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये बस चालकाचादेखील समावेश आहे.
मृतांचा आकडा वाढू शकतो कारण जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. तर या बसमध्ये ४० प्रवासी होते. त्यापैकी २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८ जण जखमी झाले आहेत.
मीडियाच्या वृत्तानुसार, व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रुगनारो यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी व्हेनिसच्या मेस्त्रे येथे एक बस उलटली आणि रस्त्याच्या खाली गेली. रेल्वे रुळाजवळ पडलेल्या बसने लगेच पेट घेतला. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला, तर केवळ १५ जणांना वाचवता आले. पोलिसांच्या मदतीने बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. मात्र, अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली दबले असून त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अहवालानुसार, अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत माहिती मिळू शकली नाही. घटनेचा तपास करण्यात येत आहे.
युरोपियन युनियनच्या अध्यक्षांनी व्यक्त केला शोक
महापौर ब्रुगनारो यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. अपघात भयंकर होता. याबाबत काही सांगता येणार नाही. त्याच वेळी, युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी देखील मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत, दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. त्याचबरोबर पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.