Greece: नायजेरियानंतर ग्रीसमध्येही ४०० प्रवाशांची पलटली; ७९ जणांचा मृत्यू तर...

ग्रीसमध्ये ४०० प्रवाशांची बोट पाण्यात पलटल्याची मोठी दुर्घटना घडली.
At least 79 dead after overcrowded migrant vessel sinks off Greece hundreds missing
At least 79 dead after overcrowded migrant vessel sinks off Greece hundreds missing
Updated on

नायजेरियातील क्वारा राज्यातील दुर्घटनेनंतर ग्रीसमध्येही ४०० प्रवाशांची बोट पाण्यात पलटल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तब्बल ७९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटानास्थळी दाखल झाली आहे. (At least 79 dead after overcrowded migrant vessel sinks off Greece hundreds missing )

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जखमींना बाहेर काढण्यासाठी तटरक्षक दलाची सहा जहाजे, नौदलाचे एक जहाज, लष्कराचे वाहतूक विमान आणि हवाई दलाचे हेलिकॉप्टर यांची मदत घेण्यात आली आहे. तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पाण्यात अडकून असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

At least 79 dead after overcrowded migrant vessel sinks off Greece hundreds missing
Bhagwat Geeta in US : अमेरिकेच्या संसदेत घुमले भगवद् गीतेचे स्वर, PM मोदींकडून...

आतापर्यंत १०४ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पाण्यातून बाहेर काढलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले जात आहे. जखमी व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी घटनास्थळी १२ रुग्णवाहीकांची सोय करण्यात आली आहे.

आतापर्यंत ३० इजिप्शियन, १० पाकिस्तान, ३५ सीरिया आणि दोन पॅलेस्टिनी नागरिकांचा वाचवण्यात यश आलं आहे. समुद्रात बुडालेली बोट सापडली की नाही याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

सुटका करण्यात आलेल्या लोकांना कलामाता शहरात नेण्यात आले आहे. येथील महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व लोकांचे वय 16 ते 41 वर्षे दरम्यान आहे. बोटीत महिला आणि लहान मुलेही होती. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बोट बुडण्याची घटना भयानक असल्याचे म्हटले आहे. यूएनने ट्विट केले की, प्राथमिक माहितीनुसार, बोटीत सुमारे 400 लोक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.