युक्रेन-रशियामधील युद्ध (Ukraine Russia War) अद्यापही सुरूच आहे. युद्ध थांबावं, यासाठी जागतिक पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. तरीही युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. याच युद्धावरून ऑस्ट्रेलियानं पंतप्रधान मोदींचं (Australia Praised PM Modi) कौतुक केलं. तसेच भारत युक्रेन-रशियामधील युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं ऑस्ट्रेलियांच्या भारतातील उच्चायुक्तांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासोबत तीनदा आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत दोनदा चर्चा केली. ही चांगली गोष्ट असून भारत युक्रेन-रशिया युद्ध सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावरून स्पष्ट होतं, असं ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ'फॅरेल म्हणाले. भारत आणि ऑस्ट्रेलियातील देवाणघेवाणीवर देखील त्यांनी चर्चा केली. भारतातील कंपन्या, शेतकरी आणि तंत्रज्ञ ऑस्ट्रेलियाला त्यांचं अधिक उत्पन्न विकतात. हे भारतासाठी आणि आमच्यासाठी देखील चांगले आहे. दोन्ही देशांतील नागरिकांचे राहणीमान, त्यांच्या नोकरीसाठी हे लाभदायक आहे, असंही उच्चायुक्त म्हणाले.
रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हापासून युक्रेनमधील अनेक शहरं उद्धवस्त झाली आहेत. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, तर काहींनी देश सोडून पलायन केले आहे. राजधानी किव्ह पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात युद्धाबाबतच्या वाटाघाटी विश्वासार्ह वातावरणात करण्यासाठी युक्रेनची राजधानी किव्ह व उत्तरेकडील चेर्नीव्ह या शहराजवळील सैनिकी कारवाया कमी करण्याचे आश्वासन रशियाने गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानुसार किव्हच्याभोवती तैनात केलेले पायदळ सैन्य मागे घेण्याची कार्यवाही अद्याप सुरू आहे. तरीही या दोन भागात रशियन सैन्याकडून बाँबहल्ले करण्यात येत आहेत. युक्रेनही प्रत्युत्तर देत असून अनेक शहरे ताब्यात घेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.