जहाजाचं कामकाज घाईघाईनं थांबवण्यात आलं आहे.
सिडनी : कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रादुर्भाव पुन्हा एकदा सुरु झाला आहे. ओमिक्रॉनचे व्हेरिएंट पुन्हा एकदा जगभर कहर करत आहेत. आता क्रूझ जहाजामध्ये (Cruise) तब्बल 800 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी (Australia Sydney) शहरात हे जहाज थांबवण्यात आलंय.
मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रूझ जहाज (Majestic Princess cruise ship) न्यूझीलंडहून निघालं होतं आणि त्यात सुमारे 4,600 प्रवासी आणि चालक दल होतं. क्रूझ ऑपरेटर मार्गुरिट फिट्झगेराल्ड यांनी सांगितलं की, हा प्रवास 12 दिवसांचा होता. यामध्ये मोठ्या संख्येनं लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
मोठ्या संख्येनं प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळ्यानं खळबळ उडालीय. जहाजाचं कामकाज घाईघाईनं थांबवण्यात आलंय. क्लेअर ओनील म्हणाले, अधिकाऱ्यांनी नियमित प्रोटोकॉल ठेवले आहेत. मॅजेस्टिक प्रिन्सेस जहाजातून प्रवाशांना कसं बाहेर काढायचं हे ठरवण्यासाठी न्यू साउथ वेल्स हेल्थ पुढाकार घेत आहे. एजन्सीनं सांगितलं की, ते प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी क्रूझ शिप क्रूसह काम करत आहेत. कंपनीचे अध्यक्ष मार्गुराइट फिट्झगेराल्ड यांनी एबीसी टेलिव्हिजनला सांगितलं की, ऑस्ट्रेलियातही कोरोनाची प्रकरणं सातत्यानं वाढत आहेत. 2020 च्या सुरुवातीला याच कंपनीच्या रुबी प्रिन्सेस क्रूझ शिपमध्ये सुमारे 900 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामध्ये सुमारे 28 जणांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.