'ब्लॅक लाईव्हज मॅटर' आंदोलनादरम्यान पोलिसांचे रेडिओ होतायत हॅक

america protest
america protest
Updated on

वॉशिंग्टन- आफ्रिकन-अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूमुळे अमेरिकेत जनक्षोभ उसळला आहे. हजोरांच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरुन फ्लॉईड यांच्या हत्येचा निषेध करत आहेत. मात्र, आंदोलनादरम्यान पोलिसांचे रेडिओ आणि वेबसाईट हॅक करण्यात येत आहेत, असा आरोप मिनियापोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी तपास करण्यात येत आहे. 

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिस कारवाईत झालेल्या मृत्यूमुळे वर्णभेदाचा मुद्दा अमेरिकेत पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक लोक रत्त्यावर उतरुन निदर्शनं करत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था ठिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसफाटा सज्ज करण्यात आला आहे. मात्र, कारवाईवेळी पोलिसांना रेडिओ किंवा वेबसाईट हॅक झाल्याचा अनुभव येत आहे.  

31 मे रोजी डलास येथे आंदोलन सुरु होते. यावेळी पोलिस विभागातील रेडिओ वारंवारतेचा कोणीतरी ताबा घेतला होता. त्यामुळे संवाद साधत असताना मध्येच गाणे ऐकू येत होते, असं अमेरिकेच्या होमलँड सिक्युरीटी विभागाच्या गुप्तचर विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसेच मिनिसोटो, टेक्सास येथील पोलिस रेडियो यंत्रणा किंवा वेबसाईट यामध्ये अडथळा निर्माण करणे फारसे अवघड नाही. फेडरल इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी यासंबंधीचा इशारा कायदा अंमलबजावणी विभागाला यापूर्वीच दिला होता. तसेच हे आंदोलन सुरुच असल्याने विभागाने सतर्क राहण्यासही सांगितलं होतं. 

शिकागो पोलिसांनाही हॅकींगच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. 30 मे रोजी झालेल्या निदर्शादरम्यान पोलिसांच्या रेडिओ वारंवारतेत शिरकाव करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान सायबर गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच पुढील काळात हॅकींगची तीव्रता वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. होमलॅड सेक्युरिटी विभागाने या आढवड्यात पोलिसांची खासगी माहिती गहाळ झाल्याचे सांगितले आहे. यात घरचा पत्ता, ईमेल पत्ता आणि फोन नंबर चोरीला गेल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अमेरिकन पोलिसांसाठी हे धोक्याचे ठरु शकते.

हॅकींगसाठी कोण जबाबदार आहे याचा अजून शोध लागलेला नाही. मात्र, हॅकींचा प्रकार वारंवार घडत असल्याने याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला. शिवाय, पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.