घरातील स्वयंचलित दिवे चोरी करतील तुमची खाजगी माहिती

घरातील स्वयंचलित दिवे चोरी करतील तुमची खाजगी माहिती
Updated on

टेक्सास : सध्या तंत्रज्ञानाने आयुष्य ब-याच प्रमाणात सुखमय केले आहे. कधीकाळी भरपूर मेहनत घ्याव्या लागणा-या गोष्टी आता तंत्रज्ञानामुळे अगदी सोप्या झाल्या आहेत. यात इंटरनेटने सर्वात महत्त्वाची कामगिरी बजावली असून सध्या प्रत्येकाच्या फोनमध्ये इंटरनेट सेवा असते. तसेच घरात देखील वायफाय सिस्टिम असते. याच वायफायवर घरातील अनेक कामे करणे सोपे झाले असून यातच स्मार्ट दिव्यांचा देखील समावेश होतो.

स्मार्ट विजेचे दिवे आपल्या बोलण्यावर किंवा फोनद्वारे सूचना देऊन बंद किंवा चालू करता येतात. मात्र हेच दिवे आपल्या मोबईल किंवा कंप्युटरमधील
 खाजगी माहिती चोरी करु शकतात. सॅन अँटोनिओ येथील टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

यासाठी तेथील शास्त्रज्ञांनी ब-याच आघाडीच्या स्मार्ट दिवे तयार करणा-या कंपन्याच्या उत्पादनांचा अभ्यास केला आहे. स्मार्ट विजेचे दिवे हे इन्फ्रारेड सुविधांयुक्त असतात. तसेच घरातील वायफायवर हे दिवे काम करत असतात. त्यामुळे हॅकर्स इन्फ्रारेड सुविधेमुळे तुमचा दिवा ज्या वायफायवर सुरु आहे तो वायफाय हॅक करु शकतात. ज्यामुळे  त्याच वायफायला कनेक्ट असणा-या
तुमच्या फोन किंवा कप्युटंरमधील खाजगी माहिती हे हॅकर्स चोरी करु शकतात.

web title : Automatic home lights will steal your personal information

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.