पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बुरे दिन, इतर देशांपुढे हात पसरण्याची आली वेळ

२४ ऑगस्टपर्यंत ७ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करणे गरजेचे
Pakistan Economic
Pakistan Economicesakal
Updated on

पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी पाकला मित्र राष्ट्रांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाक एकीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या मदतीवर अवलंबून राहिला आहे. पाकने संयुक्त अरब अमिरातकडे आर्थिक मदतीसाठी हात पसरला आहे. संयुक्त अरब अमिरात पाकच्या मदतीसाठी १ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर, पाकच्या अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेला वाईट दिवस येण्याची आता भीती वाटत आहे. संयुक्त अरब अमिरातमधील सरकारी माध्यमांच्या रिपोर्टनुसार पाकसोबत आर्थिक संबंध वाढवण्याचा विचार करण्यात येत आहे. पाकिस्तानाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीसाठीचा निकष पूर्ण करण्यासाठी ४ अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत मिळवणं आवश्यक आहे. तसेच पाक इतर देशांकडूनही मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकचे लष्करप्रमुख जरनल कमर जावेद बाजवा यांनी अमेरिकेकडेही मदतीची मागणी केली आहे.

Pakistan Economic
पाकची आर्थिक स्थिती बिकट

पाकचे लष्करप्रमुख बाजवा यांनी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्याकडेही मदत मागितली आहे. आयएमएफकडून मदत मिळण्याचे निकष पूर्ण व्हावेत म्हणून आर्थिक मदत मिळावी यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरु आहेत. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा पाकिस्तानला आहे. पाकिस्तानला २४ ऑगस्टपर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ७ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करणे गरजेचे आहे.

पाकचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडणार असल्याचा इशाराही दिला आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानला आयातीवर नियंत्रण आणावं लागणार आहे. तर माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या सरकारच्या आर्थिक धोरणांमुळं देशावर हे संकट ओढावल्याचंही ते म्हणाले. शाहबाज शरीफ यांच्या सरकारला या संकटातून मार्ग काढावा लागत असल्याचं देखील ते म्हणाले.

Pakistan Economic
Pakistan : "वाघ, सिंह, मांजर विकणे आहे"; गरिबीमुळे पाकिस्तानने प्राणी काढले विकायला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.