पोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा स्वित्झर्लंड न्यायालयात मोठा विजय

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे स्वित्झर्लंड कनेक्शन काय आहे वाचा सविस्तर
Farmer
FarmerSakal
Updated on

मुंबई : आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेचा सण म्हणजेत बैलपोळा आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना आणि इतर जणावरांचे पूजन करत मिरवणूक काढली जाते. याच मुहूर्तावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी स्वित्झर्लंडमध्ये एक न्यायालयीन लढा जिंकला आहे. ज्या किटकनाशकामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्या किटकनाशक कंपनीच्या विरोधात निर्णय देत स्वित्झर्लंडमधील न्यायालयाने शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांच्या बाजून निर्णय दिला आहे. बैलपोळ्यादिवशीच हा निर्णय आल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा विजय मानला जात आहे.

घटना आहे २०१७ ची. स्वित्झर्लंडमधील सिजेंटा या किटकनाशक कंपनीच्या औषधामुळे महाराष्ट्रातील तब्बल ६०० शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती. विषबाधा झालेल्या एकूण ६०० शेतकऱ्यांपैकी २३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये यवतमाळ येथील बंडू सोनुले यांचाही सामावेश होता.

Farmer
Congress: गुलाम नबी आझादनंतर काँग्रेसच्या आणखी पाच बड्या नेत्यांचा राजीनामा

या घटनेनंतर या कुटुंबाच्या मदतीसाठी Maharashtra association Of Pesticide's Posion Person (MAPPP) आणि Pesticide Action Network India (PAN INDIA) या दोन संस्था धावून आल्या. या संस्थांकडून सिजेंटा या कंपनीविरोधात स्विसच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण तब्बल ५ वर्षे कोर्टात चालले आणि त्यानंतर स्वित्झर्लंडमधील दिवाणी न्यायालयाने सिजेंडा या कंपनीविरोधात निर्णय दिला आहे. त्याचबरोबर या लढ्यासाठी लागलेला सर्व खर्च करण्याचे आदेश न्यायालयाने संबंधित कंपनीला दिले आहेत.

दरम्यान, पोळ्याच्या सणादिवशीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठा विजय झाल्याने समाधानाचं चित्र दिसत आहे. तर आम्हाला मदत मिळाली पाहिजे अशी आशा मृत कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.