शंभरहून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार? बलुच बंडखोरांचा दावा

बलुच लिबरेशन आर्मीने असे म्हटले आहे की पाकिस्तानी लष्कराने हा हल्ला परतवून लावल्याचा दावा खोटा आहे.
Balochistan Liberation Army, a militant organisation, has claimed to have killed more than 100 soldiers at two military camps in Pakistan
Balochistan Liberation Army, a militant organisation, has claimed to have killed more than 100 soldiers at two military camps in Pakistan टिम ई सकाळ
Updated on

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) या दहशतवादी संघटनेने गुरुवारी पाकिस्तानमधील दोन लष्करी छावण्यांमध्ये १०० हून अधिक सैनिक मारल्याचा दावा केला आहे. तर पंजगूर (Panjgur) आणि नुष्की (Nushki) या दोन्ही ठिकाणी बलुच बंडखोरांचा हा हल्ला हाणून पाडण्यात आल्याचं पाकिस्तानी लष्करानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलंय.

या हल्ल्यात बंडखोरांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्करानं केलाय. दहशतवाद्यांनी पंजगूर भागातील सुरक्षा दलाच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच प्रत्यूत्तर देत हा हल्ला उधळून लावल्याचे पाकिस्तानी लष्करानं (Pakistan Armed Forces) म्हटलंय.

Balochistan Liberation Army, a militant organisation, has claimed to have killed more than 100 soldiers at two military camps in Pakistan
'पंतप्रधान मोदी युगपुरुष आणि तपस्वी,देश २०१४ मध्ये पुन्हा स्वातंत्र्य झाला'

बलुच लिबरेशन आर्मीने असाही दावा केला आहे की पाकिस्तानने आपल्या प्रसारमाध्यमांना घटनांचे वार्तांकन करण्यास बंदी घातली होती आणि इंटरनेट (Internet) आणि फोन बंद केले होते. बलुच लिबरेशन आर्मीने असे म्हटले आहे की पाकिस्तानी लष्कराने हा हल्ला परतवून लावल्याचा दावा खोटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.