Titan Submersible : बेपत्ता अब्जाधीशांचा शोध सुरूच; पाण्याखालून अजूनही येतोय आवाज

या लोकांकडे अवघ्या काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक होता.
Titan Submersible
Titan SubmersibleeSakal
Updated on

टायटॅनिक जहाजाचे अवशेष पहायला गेलेल्या अब्जाधीशांचे सबमर्सिबल बेपत्ता होऊन आता बरेच तास उलटले आहेत. मात्र, अजूनही हे सर्व जिवंत असल्याची शक्यता व्यक्त होतेय. कॅनडाच्या रेस्क्यू टीमने पाण्याखालून दर अर्ध्या तासाने काहीतरी ठोकल्याचा आवाज येत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे आता आणखी जोमाने त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या एका छोट्या पाणबुडीमधून पाच अब्जाधीश टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेले होते. रविवारी टायटन या सबमर्सिबल मधून हे अटलांटिक महासागराच्या तळाशी जात होते. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे या पाणबुडीचा आणि त्यासह त्यातील सर्वांचा संपर्क तुटला. यानंतर बेपत्ता झालेल्या या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला होता.

Titan Submersible
Titanic Movie :टायटॅनिक चित्रपटासाठी दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी दिली होती आत्महत्येची धमकी!

या लोकांकडे अवघ्या काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक होता. त्यामुळे मंगळवारी या सर्वांच्या जिवंत असल्याची आशा कमी झाली होती. मात्र, रेस्क्यू टीममधील काही लोकांना यावेळी पाण्याखालून काहीतरी ठोकल्याचा आवाज येत असल्याचं जाणवलं.

दर अर्ध्या तासांनी याठिकाणी काहीतरी ठोकल्याचा आवाज येत होता, असं पी-८ एअरक्राफ्टमधील टीमने सांगितलं. यानंतर याठिकाणी आणखी एक सोनार टीम दाखल झाली, आणि तेव्हा देखील हा आवाज येतच होता.

Titan Submersible
Titanic New Photos : बुडालेल्या प्रेमाच्या जहाजाचे आले नवे फोटो ! टायटॅनिकचे फोटो पहिल्यांदाच जगासमोर

अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या एका ईमेलमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रोलिंग स्टोन मॅगझीनने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यासोबतच, सीएनएन या वृत्तवाहिनीने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा आवाज कशामुळे येत आहे याबाबत स्पष्टता नसली, तरी या पाणबुडीतील लोक मदतीसाठी कदाचित हा आवाज करत असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी अमेरिका, कॅनडा या देशांची नौदलं, अमेरिकेच्या सरकारी एजन्सी, आणि खासगी समुद्र पर्यटन कंपन्या संयुक्तपणे काम करत आहेत.

Titan Submersible
Titanic : टायटॅनिकच्या बेपत्ता प्रवाशांचे काय झालं? 111 वर्षांनंतर समोर आलं रहस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.