ढाका- बांगलादेशमध्ये दोन रेल्वे एकमेकांना धडकल्या असून यात कमीतकमी २० लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे एकमेकांना धडकल्याची माहिती आहे. राजधानी ढाका जवळ कृष्णगंज जिल्ह्यातील ही घटना आहे. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ढाका ट्रिब्यूनने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेकजण रेल्वे कोचच्या खाली अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु झाले आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास अपघात झाला. मृत्यूंची संख्या वाढण्याची भीती आहे. अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ( Bangladesh 20 killed several injured after two trains collide outside Dhaka)
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रवासी रेल्वे कृष्णगंज ते ढाका जात होती त्यावेळी अपघात झाला. स्थानिक माध्यमांनुसार, २० मृतदेह घटनास्थळी मिळाले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शंभर पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेकांची स्थिती गंभीर असल्याने मृत्यूचा आकडा वाढू शकतो. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.