Dengue Outbreak: बांगलादेशमध्ये डेंग्यूचं थैमान! 1000 लोकांचा मृत्यू

1000 people died: डब्ल्यूएचओनं केलंय महत्वाचं आवाहन
Dengue-like Outbreak In Ajara Taluka Kolhapur Marathi News
Dengue-like Outbreak In Ajara Taluka Kolhapur Marathi NewsEsakal
Updated on

ढाका : डेंग्यूनं बांगलादेशमध्ये मोठं थैमान झातल्याचं चित्र आहे. डेंग्यूच्या तापामुळं तब्बल १००० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत चारपट अधिक मृत्यू यावर्षी झाल्याचं सांगितलं जात आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Bangladesh dengue outbreak: Death toll crosses 1000)

बांगलादेशमधील अधिकृत माहितीनुसार, या वर्षी कमीत कमी १०१७ लोकांचा पहिल्या नऊ महिन्यात मृत्यू झाला. तर २,०९,००० लोकांना या आजाराची लागण झाली. सन २००० आलेल्या डेंग्यूच्या महामारीनंतर यंदा त्यानं सर्वाधिक थैमान घातलं आहे. यंदा मृत्यू झालेल्यांमध्ये १५ वर्षीय ११२ मुलांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये नवजात बालकांचाही समावेश आहे.

Dengue-like Outbreak In Ajara Taluka Kolhapur Marathi News
Nanded Hospital Deaths : तिन्ही पक्षांनी इन्शुरन्स काढलाय पण महाराष्ट्राचं काय? नांदेडच्या घटनेनंतर राज ठाकरे सरकारवर बरसले

या देशातील रुग्णालयांमध्ये डेंग्युच्या आजाराच्या रुग्णांवर उपाचारांसाठी बेडही कमी पडत आहेत. इथं येणारे रुग्ण ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळ, स्थायूंचं दुखणं आणि इतर गंभीर लक्षण तसेच रक्तस्राव ज्यामुळं लोकांचे मृत्यू झाले आहेत. (Latest Marathi News)

Dengue-like Outbreak In Ajara Taluka Kolhapur Marathi News
Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 16,600 च्या खाली, सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

दरम्यान, जागतीक आरोग्य संघटनेनं देखील डासांच्या प्रादुर्भावामुळं होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. वातावारणातील बदलांमुळं चिकनगुनिया, येलो फिवर, झिका हे आजार होत आहेत. (Marathi Tajya Batmya)

अद्याप डेंग्यू या आजारावर लस आलेली नाही. पण हा आजार दक्षिण आशियात जून ते सप्टेंबर महिन्यात हा आज सर्वसाधारणे पसरतो. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून राहतं आणि साठलेल्या पाण्यात डासांची पैदास झाल्यानं हे आजार होतात.

Dengue-like Outbreak In Ajara Taluka Kolhapur Marathi News
Boney Kapoor Sridevi Death: "ती उपाशी राहायची कारण...", श्रीदेवीचा मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोनी कपूरने सोडले मौन

बांगलादेशात सन १९६० पासून डेंग्यूच्या विक्रमी केसेस नोंदवल्या जात आहेत. पण सन २००० मध्ये यानं उच्चांक गाठला होता. त्यावेळी लोकांमध्ये गंभीर स्वरुपाची जीवघेणी लक्षण आढळून आली होती. त्यामुळं आता पुन्हा एकदा दशकानंतर अशीच परिस्थीती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.