Bangladesh Economic Crisis: लंकेनंतर आता बांग्लादेश; महागाईमुळे नागरिक रस्त्यावर

बांग्लादेशच्या या परिस्थितीचा चीन फायदा उचलण्याच्या तयारीत आहे.
protest
protestSakal
Updated on

ढाका : श्रीलंकेच्या आर्थिक संकटानंतर भारताचा आणखी एक शेजारी आर्थिक गर्तेत अडकल्याचं चित्र निर्माण झालं आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानंतर बांग्लादेशातील महागाईने नागरिकांच्या समस्येत आणखीनच वाढ झाली आहे. त्याचबरोबर एका रात्रीत पेट्रोल ५१ टक्कांनी महाग झाले असून या संकटामुळे तेथील जनतेने रस्त्यावर उतरत जाळपोळ आणि तोडफोड केली आहे.

(Bangladesh Financial Crisis News)

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यामुळे तेथील राष्ट्रपतींना लोकांच्या असंतोषाला सामोरं जावं लागलं होतं. नागरिकांनी लंकेचे तात्कालीन राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातल्यामुळे त्यांना देशातून पलायन करावं लागलं होतं. या सगळ्या घटनेनंतर भारताचा अजून एक शेजारी अचानक वाढलेल्या महागाईमुळे आणि पेट्रोल दरवाढीमुळे धुमसत असून नागरिकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बांग्लादेशात एका रात्रीत पेट्रोलचे भाव तब्बल ५१ टक्क्यांनी वाढल्यामुळे पेट्रोल प्रतीलिटर १३५ टकाच्या वर पोहोचले आहे. दरम्यान बांग्लादेशने पेट्रोल दरवाढीची घोषणा केल्यानंतर लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली होती पण या महागाईचा फायदा उचलण्यासाठी पेट्रोल पंपचालकांनी पेट्रोल पंप बंद केले त्यामुळे संतापलेले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. रशिया युक्रेन युद्ध आणि कोरोना महामारीनंतर बांग्लादेशात महागाई वाढली असल्याचं सांगण्यात येत आहे.

protest
Rain Updates: राज्यात पावसाचा जोर वाढला; रेड अलर्टसह अतिवृष्टीचा इशारा

बांग्लादेशच्या परिस्थितीचा चीनकडून फायदा?

बांग्लादेशच्या या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी चीनची पावले पडताना दिसत असून चीनचे परराष्ट्रमंत्री ढाक्यात पोहोचले आहेत. त्यांच्या आर्थिक मदतीविषयी चर्चा सुरू आहेत पण चीनच्या नादी लागल्याने श्रीलंकेची काय परिस्थिती झाली हे उदाहरण बांग्लादेशपुढे आहेच. दरम्यान आपल्या शेजारी राष्ट्रांना आर्थिक मदत करून त्यांचा फायदा उचलण्यात चीन माहिर असतो. त्यामध्ये आता बांग्लादेशचा सामावेश होतो का हे बघण महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.