PM Sheikh Hasina : शेख हसीना यांना पंतप्रधान मोदींचा फोन, बांगलादेशच्या जनतेचंही केलं कौतुक; म्हणाले...

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा शेख हसीना पंतप्रधान होणार आहेत. त्यांनी ३०० पैकी दोन तृतीयांश जागा जिंगल्या आहेत.
PM Sheikh Hasina
PM Sheikh Hasina esakal
Updated on

नवी दिल्लीः बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा शेख हसीना पंतप्रधान होणार आहेत. त्यांनी ३०० पैकी दोन तृतीयांश जागा जिंगल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या.

शेख हसीना यांनी सर्वाधिक काळ बांगलादेशच्या पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रमही केला आहे. 2009 पासून त्या पंतप्रधान आहेत. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला आणि त्यांच्यासोबत असलेल्या घटकपक्षाला 299 जागांपैकी 152 जागा मिळाल्या आहेत.

PM Sheikh Hasina
Ram Mandir: श्रीरामाच्या अयोध्येत नागपूरची ‘शिवगर्जना’! ढोल, ताशांच्या वादनाने अयोध्यानगरी होणार मंत्रमुग्ध

देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्यांच्या पक्षासोबत निवडणूक लढत असलेल्या घटक पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या निवडणूकीदरम्यान विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली होती.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरुन ट्वीट करत शेख हसीना यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये मोदी म्हणतात, पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संवाद साधला आणि संसदीय निवडणुकीत तब्बल चौथ्यांदा विजय मिळवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. आम्ही बांगलादेशासोबत लोककेंद्रित भागीदारी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

PM Sheikh Hasina
Raosaheb Danve : महाराष्ट्र राज्याला रेल्वे प्रकल्पांसाठी बारा हजार कोटींचा निधी

दरम्यान, 2018 मध्ये बांगलादेशात झालेल्या निवडणुकीत विक्रमी 80 टक्के मतदान झाले होते. मात्र यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. परिणामी निवडणुकीत केवळ 40 टक्के मतदान झाले. त्याचवेळी अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादिर यांनी दावा केला की, लोकांनी मतदानाद्वारे बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीचा बहिष्कार नाकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.