ढाका- बांगलादेश मध्ये ७ जानेवारीला सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्याआधीच देशातील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंसा करु नये यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आलं आहे. सैनिक रस्त्यावर उतरुन मोर्चा सांभाळत आहेत. त्यातच येथील एका रेल्वेला आग लावण्यात आली. त्यात पाच जणांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी झाले आहेत. यातील अनेकजण भारतीय नागरिक असल्याचं सांगण्यात येतंय.
सत्ताधारी पक्षाने या दुर्घटनेसाठी विरोधकांना जबाबदार धरलंय, तर विरोधकांनी हा सत्ताधाऱ्यांचा कट असल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीपूर्वी बांगलादेशमध्ये गोंधळाची स्थिती आहे. शेख हसीना सलग चौथ्यांचा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चौथ्यांदा त्या पंतप्रधान होणे जवळपास निश्चित मानलं जात आहे. कारणही तसंच आहे. विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे शेख हसीना यांच्यासमोर कोणतंच आव्हान नाहीये.
माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी-जमात-ए-इस्लामी आणि त्यांच्या घटक पक्षांनी शेख हसीना यांच्या पंतप्रधान पदाच्या राजीनामा देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर तटस्थ अशा काळजीवाहू सरकारच्या देखरेखेखाली निवडणुका घेण्यात यावेत असं म्हटलं आहे. शेख हसीना जर पंतप्रधान राहिल्या आणि अशा परिस्थितीत जर निवडणुका घेतल्या तर आपण ती जिंकणार नाही असा विश्वास विरोधकांना नाही.
शेख हसीना आपल्या पदाचा वापर करुन निवडणूक प्रकियेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्यामुळे निवडणुका झाल्या तरी हसीनाच निवडून येतील. त्यामुळे निवडणुका लढवून काहीच फायदा नाही असं विरोधकांना वाटत आहे. त्यामुळे विरोधकांनी सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. विरोधकांच्या या निर्णयामुळे शेख हसीना यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
बांगलादेशच्या विरोधी पक्षांनी भारतावर देखील आरोप केले आहेत. निवडणूक प्रक्रियेत भारत हस्तक्षेप करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेता रुहुल कबीर रिजवी यांनी एका मुलाखतीत बांगलादेशमधील निवडणुकांना 'डमी' म्हटलं आहे. दरम्यान, भारताच्या निवडणूक आयोगातील तीन सदस्य ७ तारखेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये निरीक्षणासाठी गेले आहेत.
भारत शेख हसीना यांना समर्थन देत असल्याचा आरोप विरोधी पक्षांचा आहे. भारताने एका पक्षाचा नाही तर बांगलादेशचे समर्थन करायला हवे. पण, भारत बांगलादेशच्या लोकांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताला बांगलादेशमध्ये लोकशाही हवी नाहीये, असं म्हणत विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केलीये. दुसरीकडे, भारताने हा दावा फेटाळून लावला आहे.
विशेष म्हणजे अमेरिका उघडपणे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी-जमात-ए-इस्लामीचे समर्थन करत आहे. अमेरिकेने सत्ताधारी आवामी लीगच्या नेत्यांना व्हिसाबंदी करण्याचा इशारा दिला आहे. बांगलादेशमध्ये पारदर्शक निवडणुका होणे आवश्यक आहे. तसे होत नसेल तर अमेरिका शेख हसीना यांच्या लोकांना व्हिसा बंदी करेल असं अमेरिकेने म्हटलं आहे.
बांगलादेशमध्ये लोकसभेच्या एकूण ३०० जागा आहेत. याचा अर्थ सत्तेत येण्यासाठी १५१ जागांची आवश्यकता आहे. विरोधकांनी बहिष्कार केला असल्याने ते निवडणुका लढणार नाहीत. त्यामुळे शेख हसीना यांचा पक्ष २२० जागा जिंकण्याची शक्यता आहे. हसीना यांचा निवडणुकीचा मार्ग सोप्पा झाला आहे. त्यामुळे त्याच बांगलादेशच्या चौथ्यांचा पंतप्रधान बनतील ही केवळ औपचारिकता आहे.
सत्ताधारी आवामी लीगने म्हटलंय की, बांगलादेशमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका पार पडणार आहेत. पण, विरोधकांना माहितेय की ते कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे पळवाट म्हणून त्यांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश हा भारताचा शेजारी देश असून तो अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. शेख हसीना या भारतप्रेमी नेत्या आहेत. त्यामुळे त्या सत्तेत राहणे भारताच्या अर्थाने महत्त्वाचं आहे. भारताचे शेजारील देश चीनच्या गटामध्ये जात असताना आणखी एक देश त्याच्या बाजूने जाणे धोक्याचे ठरु शकते.
बांगलादेशच्या सीमेला लागून भारताचे अनेक राज्य आहेत. भारतविरोधी असामाजिक घटकांना शेख हसीना यांनी कायमच लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे.पूर्वेकडील भारतीय राज्यांमध्ये माल वाहतूक करण्यासाठी बांगलादेशने आपल्या जमिनीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.