बांगलादेशमधील (Bangladesh) जातीय हिंसाचाराची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत.
बांगलादेशमधील (Bangladesh) जातीय हिंसाचाराची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. हिंदूंच्या दुर्गा पूजेदरम्यान 13 ऑक्टोबरपासून सुरू झालेली हिंसा (Bangladesh Violence) थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. कोमिल्लातील दुर्गा मंदिरावरील हल्ल्यानंतर, रविवारी रंगपूरच्या पीरगंज येथील हिंदूंच्या घरांना आग लावल्याची घटना उघडकीस आलीय. बांगलादेशच्या मीडिया हाऊस ढाका ट्रिब्यूनच्या अहवालानुसार, ही घटना पीरगंजच्या (रामनाथपूर युनियन) माझीपारा जेलपोलीमध्ये घडलीय. अहवालांनुसार, काही अतिरेक्यांनी हिंदूंची 20 घरं जाळली असल्याचं म्हटलंय, तर स्थानिक नागरिकांनी 65 घरांना हल्लेखोरांनी आग लावल्याचं सांगितलंय.
फेसबुक पोस्टमुळे पुन्हा भडका
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना एका फेसबुक पोस्टमुळं घडलीय. एका हिंदू व्यक्तीनं फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानं हा तणाव निर्माण झाला होता. तद्नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्या तरुणाला सुरक्षा पुरवली आणि त्याचं घर सुरक्षित ठेवलं. मात्र, तेथील जवळच्या घरांना बदमाशांनी आग लावलीय. ढाका ट्रिब्युनचे अध्यक्ष मोहम्मद सादकुल इस्लाम यांच्या मते, हे बदमाश जमात-ए-इस्लामीच्या युनिटमधील विद्यार्थी असल्याचं नमूद केलंय.
या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आलेत. त्याव्दारे हे हल्लेखोर पीरगंजचेच असल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत हे हल्लेखोर गावातील घरं जळताना आणि पोलिसांशी झटापटी करताना दिसताहेत. मात्र, ढाका ट्रिब्यूननं या व्हिडिओंबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचा पोलिस तपास करत आहे. कोमिल्लामध्ये दुर्गा मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर 12 हून अधिक जणांना अटक करण्यात आलीय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.