Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

Bangladesh MP Missing: बांगलादेशचे खासदार अनवारुन अजीम अनार हे भारतात आल्यानंतर बेपत्ता झाले आहेत.
Anwarul Azim Anar
Anwarul Azim Anar
Updated on

नवी दिल्ली- बांगलादेशचे खासदार अनवारुल अजीम अनार हे भारतात आल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. त्यांचे शेवटचे लोकेशन बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये भेटले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते संपर्काबाहेर आहेत. त्यामुळे बांगलादेशमधील त्यांच्या कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली आहे. (Bangladesh mp lawmaker Anwarul Azim Anar)

बांगलादेशमधील अनवारुल यांच्या कुटुंबीयांनी ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या गुप्तहेर शाखेकडे मदत मागितली आहे. बांगलादेशमध्ये जेनैदाह-४ मतदारसंघातून अनवारुल हे तिनदा खासदार राहिले आहेत. अनवारुल अजीम हे बेपत्ता झाल्याची माहिती त्यांची मुलगी मुमतरीन यांनी दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे मदत मागितली आहे.

Anwarul Azim Anar
RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, उपचारासाठी अनवारुल अजीम भारतात आले होते. त्यानंतर ते गायब झाले आहेत. अनवारुल यांच्या मुलीने गुप्तहेर शाखेचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त हारुन-या-रशीद यांची भेट घेतली होती. रशीद यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ढाका पोलीस भारतीय पोलिसांसोबत मिळून काम करत आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.

दाव्यानुसार,अनवारुल याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मिळाले आहे. ते १२ मे रोजी भारतात आले होते. याठिकाणी ते गोपाळ नावाच्या व्यक्तीच्या घरी थांबले. सकाळी नाष्टा करुन ते घराबाहेर पडले. पण, रात्री ते घरी आले नाहीत. तीन दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. त्यांच्यासी संपर्क देखील होत नाहीये.

Anwarul Azim Anar
Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनवारुल बेपत्ता झाल्यानंतर भारतीय विशेष कार्य बलाशी संपर्क साधण्यात आला. ऐकायला कमी येत असल्याने ते भारतात आले होते. त्यांचे एक कान खराब आहे. यासंदर्भात ते नेहमी भारतात येत असतात. बांगलादेशच्या पंतप्रधान कार्यालयाने देखील याची दखल घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.