Sheikh Hasina Resigns : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांचा राजीनामा! देश सोडून भारतामध्ये दाखल; 'हे' आहे कारण

Bangladesh PM Sheikh Hasina Resigns : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून देशातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
Bangladesh PM Sheikh Hasina Latest News
Bangladesh PM Sheikh Hasina Latest News
Updated on

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशातील अस्थिर परिस्थितीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू आहे. याआंदोलनादरम्यान आतापर्यंत ३००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या हिंसाचारादरम्यान शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून आता अंतरिम सरकार देश चालवणार आहे, अशी माहिती बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी दिली आहे.

दरम्यान राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशची राजधानी ढाका सोडली असून त्या भारतात दाखल झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. ढाक्यातील पंतप्रधान निवासस्थानी हजारो आंदोलक घुसले असून शेख हसीना त्यांच्या बहिणीसोबत अज्ञात स्थळी रवाना झाल्या असल्याची माहिती बांगलादेशमधील माध्यामांनी दिली आहे. यानंतर थोड्याच वेळात बांगलादेश लष्कराकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता बांगलादेशमधील सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर एनआयशी बोलना सांगितले की, "हिंसा भडकल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका येथील अधिकृत निवासस्थान सोडले. त्यांचा सध्याचा ठावठिकाणा अज्ञात आहे. ढाक्यातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे, आणि पंतप्रधान निवासस्थानाला जमावाने वेढा घातला आहे.

Bangladesh PM Sheikh Hasina Latest News
BEST Employees : बेस्टमधील ६० कर्मचारी झाले ‘पूजा खेडकर’! घोळ करून मिळवलं सोयीचं काम; अखेर 'असं' उघडं पडलं पितळ

नेमकं काय झालंय?

बांगलादेशात सरकारी नोकरीत आरक्षणात माजी सैनिकांच्या नातेवाईकांसाठी ठेवलेल्या कोट्याविरोधात देशभर आंदोलने केले जात होती. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेताला होता. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेकांचा मड्यू झाला आहे.

दरम्यान यादरम्यान बांग्लादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत हा कोटा कमी केला. त्यानंतर हे हिंसक आंदोलन बंद होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. विद्यार्थ्यांकडून पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन सुरूच राहिल्याने देशातील परिस्थिती जास्तच स्फोटक बनत गेली.

Bangladesh PM Sheikh Hasina Latest News
नॉस्ट्रॅडॅमसची २०२४ बद्दलची 'ती' भविष्यवाणी ठरली खरी! जगावर येणार मोठं संकट, भारत अन् चीनमधून सुरुवात?

विद्यार्थ्यांकडून शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. यावेळी सत्ताधारी अवामी लीगच्या कार्यकत्यांसोबत वाद होऊन विद्यार्थी आणि पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले, यावेळी झालेल्या हिंसाचारात ७९ जणांचा मृत्यू झालातर अनेक जण जखमी झाले होते.

यानंतर शेख हसीना यांनी आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्यांनी आंगोलनाच्या नावाखाली देशात हिंसाचार घडवून आणणारे विद्यार्थी नाहीत तर दहशतवादीच आहेत, या दहशतवाद्यांवर पोलादी हातांनी कारवाई करणे आवश्यक आहे, जनतेने या दहशतवाद्यांना दूर ठेवत सरकारला सहाय्य करावे असे आवाहन केले.

शेख हसीना यांच्याकडून आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते, मात्र त्यांचे निमंत्रण धुडकावून लावत आंदोलक त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.