Viral Video : भारतात घुसण्यासठी 'बजरंगी भाईजान टेक्निक', बांगलादेशी यूट्यूबरच्या व्हिडीओमुळे खळबळ; नेमकं काय आहे प्रकार?

Bangladeshi YouTuber bajrangi bhaijaan technique : यूट्यूबवर डीएच ट्रॅव्हलिंग इन्फो नावाने एका चॅनल आहे, या चॅनलवरील एका व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
Bangladeshi YouTuber video goes viral after he guide to illegal entry into India marathi news
Bangladeshi YouTuber video goes viral after he guide to illegal entry into India marathi news
Updated on

यूट्यूबवर डीएच ट्रॅव्हलिंग इन्फो नावाने एका चॅनल आहे, या चॅनलवरील एका व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामागचे कारण काय? तर या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लोकांना बांगलादेशातून भारतात येण्यासाठी तुम्हाला कोणत्याही व्हिसा किंवा कोणत्याही कागदपत्रांची गरज नसल्याचे सांगत आहे. यानंतर ही व्यक्ती एका रस्त्याकडे बोट दाखवताना दिसतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती स्वतः बांगलादेशच्या सुनमगंज जिल्ह्यात उभा दिसत आहे, बांगलादेशा मधील या भागातून भारतात घुसखोरी केली जाते. हा व्यक्ती एका रस्त्याकडे बोट दाखवत सांगतो की, जर तुम्ही या रस्त्यावरून भारतात गेलात तर तुम्हाला काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो, जसे की बीएसएफ तुम्हाला पकडू शकते.

Bangladeshi YouTuber video goes viral after he guide to illegal entry into India marathi news
Chandrakant Patil: भाजपची 288 जागांवर लढण्याची तयारी पण... चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट सांगितलं

व्हिडिओच्या पुढच्या भागात तो बीएसएफ कॅम्प दाखवतो आणि म्हणतो की तो भारतीय लष्कराचा कॅम्प आहे. यानंतर तो काही बोगदे दाखवतो आणि सांगतो की यामधून तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करू शकता. व्हिडीओच्या शेवटी तो म्हणतो की, कोणीही अशा प्रकारे भारतात प्रवेश करू नये कारण यामुळे जगात बांगलादेशचे नाव खराब होते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर लोक त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. याला आतापर्यंत सुमारे 2 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 7000 लोकांनी हा व्हिडीओ लाइक देखील केला आहे. अनेक लोकांनी बजरंगी भाईजान या सलमान खानच्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे घुसघोरी होण्याच्या शक्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत कारवाईची मागणी देखील केली आहे.

Bangladeshi YouTuber video goes viral after he guide to illegal entry into India marathi news
IND vs SL : 'आम्ही भाग्यवान होतो की...', कर्णधार सूर्याला वाटत होती भीती? मॅच संपल्यानंतर केलं मोठे वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.