Hindu Mandir Vandalized: 'हिंदूंनो परत जा'! अमेरिकेतील BAPS मंदिराची तोडफोड, महिन्याभरातील दुसरी घटना

Swaminarayan Mandir in California was vandalized: विशेष म्हणजे १० दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कमधील हिंदू मंदिराचे नुकसान करण्यात आले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडली आहे.
Swaminarayan Mandir
Swaminarayan Mandir
Updated on

नवी दिल्ली- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील BAPS श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच, यावेळी 'हिंदुंनो परत जा' असे हिंदू विरोधी मजकूर देखील लिहिण्यात आला आहे. विशेष म्हणजे १० दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कमधील हिंदू मंदिराचे नुकसान करण्यात आले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडली आहे.

BAPS ही ना नफा हिंदू संस्था आपल्या निवेदनात म्हणाली आहे की, न्यूयॉर्कमधील मालविल्ले येथे BAPS श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करून १० दिवस झाले नाहीत, तोच आमचे कॅलिफोर्नियातील सॅक्रोमेंटो येथील हिंदू मंदिराची तोडफोड आणि अपवित्र करण्यात आले आहे. याठिकाणी द्वेषपूर्ण मजकूर लिहिण्यात आला आहे.

Swaminarayan Mandir
Hindu Muslim Unity : जातीय सलोख्याचे दर्शन घडविणारा ‘जळगाव पॅटर्न’; हिंदू बांधव दर्ग्यावर चढवितात चादर

आमचं दु:ख आणखी वाढलं आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. ज्यांच्या मनामध्ये द्वेष आहे त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करतो, त्यांची मनं आणखी मजबूत व्हावीत, असं निवेदनात म्हणण्यात आलं आहे. स्थानिक खासदार अमी बेरा यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. असहिष्णुतेच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

सॅक्रामेंटो काउंटीमध्ये द्वेष आणि कट्टरतावादाला काहीही स्थान नाही. मी सदर प्रकारचा निषेध करतो. आपण सर्वांनी या असहिष्णणुतेविरोधात उभे राहायला हवं. यासाठी आपण आपला विश्वास, मतभेद बाजूला ठेवून एकत्र यायला हवं, असं खासदारर अमी बेरा म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.

Swaminarayan Mandir
Nashik Hindu Morcha Rada: जुने नाशिक दंगलखोरांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी! कडेकोट बंदोबस्त; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले

हिंदू अमेरिकन सोसायटीने यासंदर्भात सिनेट ज्युडिसरी कमिटीकडे पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. हिंदूंविरोधात द्वेषाची भावना वाढली आहे. हिंदूंची प्रार्थना स्थळी लक्ष्य केली जात आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून हिंदू व्यक्ती आणि हिंदू मंदिरांना निशाणा बनवलं जात आहे. त्यामुळे हिंदू नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.