पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ च्या अध्यक्षपदासाठी बॅरिस्टर गौहर अली खान यांचे नाव सुचवले होते. अखेर बॅरिस्टर गौहर अली खान यांची पाकिस्तान पीटीआयचे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गौहर खान हे सध्या तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांची जागा घेतील, पाकिस्तानच्या ARY न्यूजच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
इमरान खान जेलमध्ये असल्याने ते आगामी निवडणूक लढवणार नाहीयेत. त्यापूर्वी पीटीआय पक्षात निवडणूका पार पडल्या ज्यामुध्यो गौहर अली खान यांची बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
कोन आहेत बॅरिस्टर गौहर?
बॅरिस्टर गौहर अली खान पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बुनेर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील दोन वेळा प्रांतिक विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर गौहर खान यांनी इंग्लंडच्या वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठात प्रवेश घेतला. येथून त्यांनी एलएलबी (ऑनर्स) चे शिक्षण घेतले. वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठात त्यांना अडव्हांस क्रिमीनल एव्हिडन्स आणि कंपनी लॉ मध्ये प्रथम क्रमांक मिळाला. प्रथमच अंतिम परीक्षेत चांगले गुण मिळविणारे १३ पाकिस्तानी विद्यार्थ्यांपैकी (तत्कालीन) ते एकमेव विद्यार्थी होते आणि त्यांना बॅरिस्टर-एट-लॉ (लिंकन इन) बोलवण्यात आले होते.
यानंतर ते अमेरिकेला निघून गेले आणि वॉशिंग्टन स्कूल ऑफ लॉ मध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी टॅक्सेशन मध्ये एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले. गौहर यांनी एलएलएम मध्ये सात विषयांमध्ये ए प्लस ग्रेस मिळवले होते.
अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून गौहर अली खान हे पाकिस्तानात परतले. येथे तो एतजाज अहसन आणि असोसिएट्स नावाच्या फर्ममध्ये सामील झाला. बॅरिस्टर ऐतजाझ अहसन यांच्या देखरेखीखाली त्यांनी लिगल रिसर्चचे काम शिकून घेतले. यानंतर, उच्च न्यायालयाच्या समितीने त्यांना बेसिक ट्रेनिंगमधून विशेष सूट दिली आणि त्यांची थेट उच्च न्यायालयाचे वकील म्हणून नोंदणी झाली. २०१६ पासून ते पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.