वीजेच्या खांबावर चढला अस्वल; तारांमध्ये गुरफटला अन्...

अस्वल विजेच्या तारांमध्ये गुरफटल्यामुळे त्याला गुंता सोडवणं अशक्य झालं होतं
वीजेच्या खांबावर चढला अस्वल; तारांमध्ये गुरफटला अन्...
Updated on

सोशल मीडियावर कायमच प्राण्यांचे काही मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. यात अनेकदा हे प्राणी त्यांच्या नाठाळ स्वभावामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. तर, असेही काही व्हिडीओ असतात जे पाहून आपलं मन हेलावून जातं. सध्या सोशल नेटवर्किंगवर असाच एका अस्वलाचा (bear)फोटो व्हायरल झाला आहे. विजेच्या पोलवर चढलेला हा अस्वल विजेच्या तारांमध्ये चांगलाच गुरफटून गेला आहे. (bear-found-stuck-in-electricity-pole-this-is-what-happened-next)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक अस्वल विजेच्या पोलवर चढल्याचं दिसून येत आहे. यात पोलवरुन खाली उतरत असतांना हे अस्वल विजेच्या तारांमध्ये गुरफटून जातं आणि तो गुंता सोडवणं त्याला अशक्य होतं. मात्र, तेथे उपस्थित असेलल्या नागरिकांनी या मुक्या जीवाची मदत केली असून त्याला सुखरुपरित्या सोडवलं आहे.

वीजेच्या खांबावर चढला अस्वल; तारांमध्ये गुरफटला अन्...
'सजीवसृष्टी नष्ट होण्यामागे एलियन ठरतील कारण'

Willcox सिटीबाहेर असलेल्या एका विजेच्या पोलवर एक अस्वल चढलं होतं. या अस्वलाला सल्फर स्प्रिंग्स व्हॅली इलेक्ट्रिक कॉरपोरेटिव्हच्या कर्मचाऱ्यांनी पाहिलं आणि त्याविषयी कंपनीला माहिती दिली. त्यानंतर कंपनीचे इलेक्ट्रिशिअन Werner Neubauer यांनी त्वरीत संपूर्ण वीजपुरवठा खंडित केला.

अस्वलाला विजेचा धक्का बसू नये म्हणून वीजपुरवठा खंडित केल्यानंतर Neubauer यांनी बकेट लिफ्टच्या माध्यमातून अस्वलासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, Neubauer सातत्याने या अस्वलासोबत संवाद साधत होते. अस्वलाला त्यांची भाषा समजत नाही हे त्यांना माहित होतं. मात्र, त्याच लक्ष वेधलं जावं यासाठी त्यांनी संवाद सुरु ठेवला. एकीकडे संवाद सुरु असतांना Neubauer त्याला तारांमधून सोडवण्याचा प्रयत्न करत होते आणि अखेर या अस्वलाला तारांच्या गुंत्यातून सोडवण्यात Neubauer यांना यश आलं. विशेष म्हणजे तारांमधून सुटका झाल्यावर अस्वलदेखील लगेच खांबावरुन खाली उतरल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.