Benjamin Netanyahu : बेंजामिन नेतन्याहू पुन्हा बनले इस्रायलचे पंतप्रधान; सहाव्यांदा घेतली शपथ

नेतन्याहू यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
Benjamin Netanyahu
Benjamin Netanyahuesakal
Updated on
Summary

नेतन्याहू यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी गुरुवारी इस्रायलचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलीये. 73 वर्षीय नेतान्याहू सहाव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान बनले आहेत. ते सर्वाधिक काळ इस्रायलचं पंतप्रधानपद भूषवत आहेत.

Benjamin Netanyahu
Heeraben Modi Demise : आईचा आशीर्वाद घेण्यासाठी PM मोदींनी प्रत्येकवेळी घेतली भेट; मायेचा दिसला आदर

इस्रायलच्या 120 सदस्यीय संसदेत नेतान्याहू यांना 63 खासदारांचा पाठिंबा होता. सभागृहात 54 खासदारांनी त्यांच्या सरकारच्या विरोधात मतदान केलं. नेतान्याहू यांच्या सरकारमध्ये अनेक उजव्या पक्षांचा सहभाग आहे.

यामध्ये शास, युनायटेड तोराह ज्युडाइझम, ओत्झ्मा येहुदित, धार्मिक झिओनिस्ट पार्टी आणि नोआम यांचा समावेश आहे. इस्रायलमध्ये 37 व्या सरकारच्या स्थापनेसाठी विश्वासदर्शक ठरावापूर्वी लिकुड पक्षाचे खासदार अमीर ओहाना यांची संसदेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीये.

Benjamin Netanyahu
Pele Passed Away : चहाच्या दुकानात काम करणारा 'पेले' कसा बनला महान फुटबॉलपटू; जाणून घ्या मनाला भिडणारी कहाणी

मंत्रिमंडळ स्थापन, 5 महिलांचा समावेश

नेतान्याहू यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात 31 मंत्री आणि तीन उपमंत्र्यांची नियुक्ती केलीये. संरक्षण, शिक्षण आणि कल्याण मंत्रालयात प्रत्येकी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलीये. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात पाच महिलांचाही समावेश केला आहे. दरम्यान, नेतन्याहू यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.