Benjamin Netanyahu यांना सत्ता मिळताच इस्रायलवर हल्ला; गाझा पट्यातून डागले 4 रॉकेट

PM नरेंद्र मोदींचे मित्र बेंजामिन नेतन्याहू पुन्हा एकदा इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले आहेत.
Benjamin Netanyahu
Benjamin Netanyahuesakal
Updated on
Summary

PM नरेंद्र मोदींचे मित्र बेंजामिन नेतन्याहू पुन्हा एकदा इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले आहेत.

बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) पुन्हा एकदा इस्रायलच्या (Israel) सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेत. त्यांच्या विजयानंतर काही वेळातच गाझा पट्टीतून एकामागून एक चार क्षेपणास्त्रं (Missile) डागण्यात आली. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

प्रथम क्षेपणास्त्र डागल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं. त्यानंतर एक तासाच्या अंतरानंतर गाझा पट्टीतून तीन क्षेपणास्त्रं डागण्यात आली. हा हल्ला पॅलेस्टिनी जिहादींनी केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र, अद्याप कोणीही रॉकेट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर, सुरक्षा दलांनी गाझा सीमेजवळील किसुफिम, ऐन हशलोशा आणि नीरिम या शहरांना रॉकेट सायरनसह सतर्क केलं, असं द टाईम्स ऑफ इस्रायलनं वृत्त दिलं. रॉकेट हल्ल्यानंतर आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. आधी क्षेपणास्त्र डागल्याचं लष्करानं सांगितलं. त्यानंतर सुमारे तासाभरानंतर दक्षिण इस्रायलमधील गाझा येथून आणखी तीन रॉकेट डागण्यात आले.

Benjamin Netanyahu
Taloja Jail : बाटलीत डास भरले अन् त्यानं थेट कोर्टच गाठलं; कैद्याच्या 'त्या' मागणीवर न्यायाधीशही हैराण

लष्करानं रॉकेट हल्ला हाणून पाडला

इस्त्रायली सुरक्षा दलांचं (Israeli Security Forces) म्हणणं आहे की, आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टमद्वारे रॉकेट रोखण्यात आले. यापूर्वी, जेनिन या वेस्ट बँक शहरात इस्रायली लष्करी कारवाईदरम्यान पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचा एक सदस्य मारला गेला होता. आयडीएफ आणि सीमा पोलिसांनी संयुक्त निवेदनात म्हटलं की, 'ऑपरेशनमध्ये मारला गेलेला जिहादी फारूख सलामेह या वर्षाच्या सुरुवातीला एका अनुभवी पोलीस कमांडोच्या हत्येत सामील होता आणि पुढील हल्ल्यांची योजना आखत होता.'

Benjamin Netanyahu
Accident : दिवाळी, छठपूजा संपवून महाराष्ट्रात परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; बस-कारच्या धडकेत 11 जण ठार

नेतन्याहू आणि त्यांच्या मित्रपक्षांनी इस्रायलमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर लष्करीचं हे वक्तव्य समोर आलंय. याआधी मंगळवारी नेतन्याहू यांनी जेरुसलेममधील रॅलीदरम्यान त्यांच्या समर्थकांना सांगितलं, "मला विश्वास आहे की आम्ही जिंकू. आम्ही मोठा विजय मिळवणार आहोत." दुसरीकडं इस्रायलचे काळजीवाहू पंतप्रधान यायर लॅपिड यांनीही माजी पंतप्रधान नेतन्याहू यांचं अभिनंदन केलं. लॅपिड म्हणाले, "इस्रायल कोणत्याही राजकीय विचारांच्या वर आहे. मी नेतन्याहू यांना इस्रायल आणि राष्ट्रासाठी शुभेच्छा देतो."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.