Shivani Raja: भारतीय वंशाच्या 29 वर्षीय गुजराती उद्योगपती शिवानी राजा ब्रिटनमध्ये खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. यावेळी त्यांनी भगवद्गीतेवर हाथ ठेवून शपथ घेतली आहे. शिवानी यांनी लीसेस्टर पूर्व जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे.
हा विजय खुप महत्वाचा आहे कारण लेबर पार्टीचे 37 वर्षांचे वर्चस्व यांनी संपुष्टात आणले आहे. लेबर पार्टीचे उमेदवार राजेश अग्रवाल यांच्या विरोधात लढून त्यांनी ही निवडणूक जिंकली.
खासदार म्हणून संसदेत शपथ घेतल्या नंतर शिवानी यांनी पोस्ट करत लिहीले की, "लीसेस्टर पूर्वेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आज संसदेत शपथ घेणे ही एक सन्मानाची बाब आहे. गीतेवर हाथ ठेवून मी महामहिम राजा चार्ल्स यांच्याशी माझ्या निष्ठेची शपथ घेतली.याचा मला खुप अभिमान वाटत आहे.
शिवानी यांना मिळालेला हा विजय खुप महत्त्वाचा आहे. कारण लीसेस्टर पूर्व मतदार संघ हा कामगारांचा गड आहे. 1987 पासून या ठिकाणी फक्त लेबर पार्टी निवडून येत आहे. मात्र 37 वर्षात पहिल्यांदाच या मतदारसंघातून लेबर पार्टी नाही तर शिवानी निवडून आल्या आहेत.लंडनचे माजी उपमहापौर अग्रवाल यांचा पराभव शिवानी राजा यांनी केला. शिवानी यांना 14,526 मते मिळाली. तर 10,100 अग्रवाल यांना मते मिळाली.
इतिहासात पहील्यांदाच हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये महिलांची संख्या खुप मोठी आहे. सुमारे 263 महिला खासदार यंदा निवडून आल्या आहेत. जेकी अंदाजे 40 टक्के आहे. युनायटेड किंगडममध्ये 4 जुलै रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवानी व्यतिरिक्त इतर 27 भारतीय वंशाचे खासदार हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.