पंतप्रधान मोदींचा भूतानच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरव

PM Narendra Modi
PM Narendra Modi
Updated on
Summary

२०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदा भूतानचा दौरा केला होता. त्यानंतर २०१९ मध्येही पंतप्रधान झाल्यानंतर ते भूतान दौऱ्यावर गेले होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भूतानने (Bhutan) त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून गौरवलं आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाने जगात थैमान घातलं आहे. अशा परिस्थित मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आणि आवश्यक ती मदत केली. भूतानच्या सर्व नागरिकांकडून मोदीजींचे अभिनंदन असंही भूतानच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं. भूतानने Ngadag Pel gi Khorlo हा त्यांचा सर्वोच्च पुरस्कार मोदींना देण्यात येणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विशेषत: कोरोनाच्या संकटात दिलेला मैत्रीपूर्ण मदतीचा हात खूपच महत्त्वाचा ठरला. दोन्ही देशांमध्ये अनेकदा संवाद झाला. मोदी महान असून ते धार्मिकही आहेत. त्यांचा गौरव करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत अशा भावना भुतानने व्यक्त केल्या आहेत. भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शेरिंग यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींनी कठीण काळात मैत्री निभावली आहे. भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, भारत आणि भूतान या दोन्ही देशातील संबंध महत्त्वाचे आहेत. भारत भूतानचा सर्वात मोठा ड्रेड आणि डेव्हलपमेंट पार्टनर आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये मदत केली आहे. यात १०२० मेगावॅट ताला हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट, पारो एअरपोर्ट, भूतान ब्रॉडकास्टिंग स्टेशन इत्यादींचा समावेश आहे.

PM Narendra Modi
भारतात मुलींच्या लग्नाचं वय 21 होतंय, इतर देशांमध्ये कायदेशीर वयोमर्यादा 12

भारत हा भूटानचा आघाडीचा ट्रेड पार्टनर आहे. दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार होतो. कोरोनाच्या काळात भारताने भूतानला सर्वतोपरी मदत केली. भूतानला लाखो कोरोना लशींचे डोस मोफत पुरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पहिला परदेश दौरा भूतानचा केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानतंरही त्यांनी ऑगस्टमध्ये भूतान दौरा केला होता. गेल्या काही वर्षात भारत आणि भूतानमधील संबंध मजबूत झाले असून यामुळेच भूतानने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन मोदींना गौरवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()