European Union : ‘रॅन्समवेअर’विरोधात मोठी कारवाई ; चार संशयितांना अटक,शंभराहून अधिक सर्व्हर बंद

ईमेलच्या माध्यमातून ‘रॅन्समवेअर’ पसरविणाऱ्या ऑनलाइन जाळ्याविरोधात येथील पोलिसांनी आज मोठी कारवाई केली. चार संशयितांना अटक करतानाच शंभराहून अधिक सर्व्हर बंद करण्यात आले आणि दोन हजारांहून अधिक इंटरनेट डोमेन्सवर नियंत्रण मिळविले.
European Union
European Unionsakal
Updated on

हेग (नेदरलँड) : ईमेलच्या माध्यमातून ‘रॅन्समवेअर’ पसरविणाऱ्या ऑनलाइन जाळ्याविरोधात येथील पोलिसांनी आज मोठी कारवाई केली. चार संशयितांना अटक करतानाच शंभराहून अधिक सर्व्हर बंद करण्यात आले आणि दोन हजारांहून अधिक इंटरनेट डोमेन्सवर नियंत्रण मिळविले.

युरोपीय महासंघाच्या न्याय विभागाच्या (युरोजस्ट) सहकार्याने करण्यात आलेली ही कारवाई सायबर गुन्हेगारीविरोधातील आतापर्यंतची सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय कारवाई होती, असे ‘युरोजस्ट’ने सांगितले. तीन वर्षांपूर्वी ‘इमोलेट’ नावाच्या नेटवर्कवर कारवाई करण्यात आली होती. संगणक हॅक करून माहितीची चोरी करणे, धमकी देणे असे प्रकार या नेटवर्कमार्फत केले जात होते. ‘

जगभरात हजारो जणांची ‘रॅन्समवेअर’च्या माध्यमातून फसवणूक होत असते. ईमेल पाठवून त्याद्वारे संगणक हॅक केला जातो आणि त्याची गोपनीय माहिती चोरली जाते. यानंतर या माहितीच्या बदल्यात खंडणीची मागणी केली जाते.

असे करणाऱ्या एका नेटवर्कवर आज कारवाई करण्यात आली. ‘रॅन्समवेअर’च्या माध्यमातून एका संशयिताने साडे सात कोटी रुपये मूल्याची क्रिप्टोकरन्सी मिळविल्याचा दावाही ‘युरोजस्ट’ने केला आहे. ‘युरोजस्ट’ने केलेल्या कारवाईमध्ये ‘आयसेडआयडी’, ‘पिकाबॉट’, ‘स्मोकलोडर’, ‘बम्मलबी’ आणि ‘ट्रिकबॉट’ यांसारख्या मालवेअर ड्रॉपर्सवर कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.