ब्राझीलमध्ये वणव्यामुळे साखर उत्पादनात लक्षणीय घट; तब्बल 50 लाख टन उसाचे नुकसान, 60 हजार हेक्टर क्षेत्र भस्मसात

Brazil Sugarcane Farm Fire : यंदा भारतासारख्या देशाने साखर निर्यातीवर बंदी कायम ठेवल्याने ब्राझीलमधील साखरेला चांगला दर होता.
Brazil Sugarcane Farm Fire
Brazil Sugarcane Farm Fireesakal
Updated on
Summary

अचानक लागलेली ही आग नियंत्रित करणे ब्राझीलला सहज शक्य झाले नाही. यामुळे सुमारे साठ हजार हेक्टरवरील उसाचे क्षेत्र भस्मसात झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

कोल्हापूर : ब्राझीलमध्ये गेल्या महिन्यात ऊस शेतीला लागलेल्या मोठ्या आगीचा (Brazil Sugarcane Farm Fire) फटका बसून ब्राझीलचे साखर उत्पादन (Sugar Production) घटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये साखर उत्पादन दहा टक्क्यांनी घटले आहे. झपाट्याने आग पसरत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अडचणीचे ठरत आहे.

यंदा भारतासारख्या देशाने साखर निर्यातीवर बंदी कायम ठेवल्याने ब्राझीलमधील साखरेला चांगला दर होता. ऑगस्टपर्यंत ब्राझीलच्या हंगाम सुरळीत सुरू होता. ब्राझीलमध्ये तयार होणारी बहुतांश साखर जागतिक बाजारपेठेत (Global Market) येत असल्याने साखरेच्या दरात फारशी वाढ होत नव्हती. दर कमी असले तरी फार नीचांकी पातळीवर नसल्याने याचा फायदा ब्राझीलला होत होता. हंगाम वेगात सुरू असताना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मात्र ब्राझीलच्या ऊस शेतीला विविध भागात आग लागली ही आग झपाट्याने पसरली.

Brazil Sugarcane Farm Fire
उसाला दुसरा हप्ता 100 रुपयासह 50 रुपये देण्याच्या प्रस्तावास मान्यता; साखर आयुक्तांचा महत्त्वाचा आदेश जारी

अचानक लागलेली ही आग नियंत्रित करणे ब्राझीलला सहज शक्य झाले नाही. यामुळे सुमारे साठ हजार हेक्टरवरील उसाचे क्षेत्र भस्मसात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. याचा तातडीचा परिणाम ऑगस्टमधील साखर उत्पादनावर दिसून आला आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत या ऑगस्टमध्ये दहा टक्क्यांनी उत्पादन घटले आहे. आतापर्यंत सुमारे ५० लाख टन उसाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान जवळजवळ १०० टक्के झाले असल्याचा अंदाज ब्राझीलमधील साखर उद्योगाचा आहे. जळालेल्या उसातून केवळ एक टक्का उत्पादन निघू शकेल, अशी शक्यता तेथील साखर उद्योगाने व्यक्त केली आहे.

Brazil Sugarcane Farm Fire
दलित विद्यार्थ्यांसाठी उघडली 'आयआयटी'ची दारे; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा ऐतिहासिक आदेश

आंतरराष्ट्रीय साखर बाजारात मात्र यंदा या नुकसानीमुळे किती काळापर्यंत साखर उत्पादन कमी येईल याबाबतचा अंदाज व्यक्त होत नसल्याने साखरेचे दर कमी-जास्त होत आहेत. भारताने अजूनही नव्याने धोरण स्पष्ट केले नाही, त्यामुळे यंदाच्या हंगामात भारतातून बाहेर साखर येणार नाही, ही शक्यता गडद होत आहे. अन्य देशांमध्येही वातावरणातील बदलामुळे ऊस पिकाची वाढ फारशी झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर ब्राझील एकमेव स्रोत जागतिक बाजारात साखरेसाठी होता.

भारताच्या भूमिकेविषयी उत्सुकता

भारताच्या भूमिकेविषयी अजूनही जागतिक बाजारामध्ये उत्सुकता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतामध्ये जादा साखर शिल्लक असल्याने केंद्र सरकार निर्यातीला काही प्रमाणात परवानगी देईल, असा आशावाद आंतरराष्ट्रीय साखर बाजाराला आहे. मात्र केंद्राकडून अजूनही नेमका अंदाज उद्योगाला देण्यात आला नसल्याने निर्यातीच्या धोरणाविषयी संभ्रम कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.