Twitter: पराग अग्रवालांच्या हाकालपट्टीबाबत मोठा खुलासा! ट्विटरच्या पदाधिकाऱ्यांमधील चॅट लीक

या चॅटमध्ये इलॉन मस्क, जॅक डोर्सी, पराग अग्रवाल, ब्रेट टेलर यांच्यामध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत.
twitter ceo parag agrawal and jack dorsey welcomes elon musk on twitter compony board
twitter ceo parag agrawal and jack dorsey welcomes elon musk on twitter compony board Sakal
Updated on

नवी दिल्ली : इलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदा ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांची हाकालपट्टी करण्यात आली. पण त्यांना का काढून टाकण्यात आलं याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे. ट्विटरचे एक्सेक्युटिव्ह अर्थात ट्विटरचे वरिष्ठ अधिकारी आणि इलॉन मस्क यांच्यातील मेसेजेस लीक झाले आहेत. यामध्ये ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी, माजी सीईओ पराग अग्रवाल आणि ट्विटरचे संचालक मंडळातील सदस्य ब्रेट टेलर यांचा समावेश आहे. या सर्वांशी इलॉन मस्क यांनी केलेलं चॅट आणि ई-मेल मेसेज ट्विटरवर लीक झाले आहेत. (Big reveal in Parag sacking Messages between Elon Musk and Twitter execs leak)

या सर्वांमध्ये काय चर्चा झाली होती जाणून घ्या...

6 एप्रिल 2022

इलॉन मस्क : माझ्याकडे अनेक कल्पना आहेत. त्यानुसार मला फक्त ट्विटर जास्तीत जास्त मजेशीर बनवायचं आहे.

पराग अग्रवाल: मला सर्व कल्पना ऐकायच्या आहेत. मी तुम्हाला सांगेन की कोणत्या गोष्टी करायला हव्यात किंवा नाही, आणि का?

पराग अग्रवाल: या टप्प्यावर तुमच्यासोबत जास्त वेळ घालवणं चांगलं राहिल. दोन्ही बाजूंची माहिती अंतर्भूत करण्यासाठी ट्विटर आणि इंजिनिअर्सच्या टीमला तुमच्याशी बोलायला हवं.

इलॉन मस्क: मला ट्विटर कोडबेसचे तांत्रिक तपशील समजून घ्यायचे आहेत. हे मला माझ्या सूचनांना कॅलिब्रेट करण्यात मदत करेल.

इलॉन मस्क: मी 20 वर्षे हेवी ड्युटी सॉफ्टवेअर बनवलं आहे.

पराग अग्रवाल: मी सीटीओ होतो आणि आमच्या कोडबेसमध्ये मी बराच काळ काम केलं आहे.

पराग अग्रवाल: त्यामुळं तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकतो.

इलॉन मस्क: प्रोग्राम मॅनेजर/एमबीए केलेल्या हार्डकोर प्रोग्रामिंग करू शकणार्‍या अभियंत्यांशी मी चांगल्या प्रकारे इंटरफेस करतो.

पराग अग्रवाल: आपल्या पुढच्या संभाषणात तुम्ही मला एका इंजिनिअरसारखं वागना सीईओसारखं नाही. त्यानंतर मला कळेल की तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी सर्वोत्तम अभियंता कोण असू शकतो.

इलॉन मस्क: खरं सांगायचे तर, मला व्यावस्थापनाच्या गोष्टी करणं आवडत नाही. मला असं वाटत नाही की कोणी कोणाचा बॉस असावा. पण मला तांत्रिक/उत्पादन डिझाइन समस्या सोडवण्यात मदत करायला आवडते.

इलॉन मस्क: तुम्हाला समजलं?

9 एप्रिल 2022

पराग अग्रवाल: तुम्ही ट्विट करण्यास मोकळे आहात 'ट्विटर मरत आहे का?' सध्याच्या संदर्भात Twitter ला अधिक चांगलं बनवण्यात मला मदत होत नाही हे सांगण्याची जबाबदारी माझी आहे. पुढच्या वेळी मी तुम्हाला आत्ताच्या अंतर्गत घडामोडी आणि कार्य करण्याच्या क्षमतेला कसं नुकसान होतंय याबद्दल माहिती देऊ इच्छितो.

इलॉन मस्क: या आठवड्यात तुम्ही काय केलं?

इलॉन मस्क: मी संचालक मंडळात सामील होत नाही, हा वेळेचा अपव्यय आहे.

इलॉन मस्क: ट्विटरच्या खाजगीकरणाची ऑफर देईल

एका दिवसानंतर, ब्रेट टेलर जे ट्विटरच्या संचालक मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी मस्क यांचं पराग यांच्याशी झालेल्या संभाषणाची कबुली दिली आणि उत्तर दिलं

10 एप्रिल 2022

ब्रेट टेलर : काल परागसह तुमचा संभाषणानुसार तुम्ही मंडळात सामील होण्यास नकार देत आहात. मी आमच्या टीमला आज तुमच्या फॅमिली ऑफिससोबत मसुदा शेअर करण्यास सांगितलं आहे. मी आज बोलण्यास उत्सुक आहे.

इलॉन मस्क: छान वाटतंय

इलॉन मस्क: माझ्या मते, ट्विटर खाजगी होणं त्याची पुनर्रचना करणं आणि ते पूर्ण झाल्यावर सार्वजनिक बाजारात परत येणं चांगले आहे. मी त्याच्याशी बोललो तेव्हा जॅकचंही हेच मत होतं.

हे संभाषण 13 एप्रिल 2022 रोजी पुढे चालू आहे :

इलॉन मस्क: अनेक दिवसांच्या विचारमंथनानंतर ही बाब स्पष्ट आहे की मी ट्विटर वैयक्तिकरित्या विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला आज रात्री ऑफर लेटर पाठवीन, जे सकाळी सार्वजनिक होईल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास माझ्या टीमशी तुम्हाला जोडण्यात आनंद होईल. धन्यवाद, इलॉन.

ब्रेट टेलर : मान्य

ब्रेट टेलर : मला तुमचा ईमेल मिळालाय की नाही याची मी खात्री करतोय. यापुढे कृपया माझा वैयक्तिक ईमेल वापरा.

इलॉन मस्क: करेल

त्यानंतर मस्क यांनी जॅक डोर्सी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना Twitter अधिक चांगलं करण्यासाठी त्यांची मदत हवी असल्याचं म्हटलं.

26 एप्रिल 2022

जॅक डॉर्सी : मला खात्री करून घ्यायची आहे की, पराग यांच्याकडे जबाबदारी येईपर्यंत तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहात की नाही. विशिष्ट दिशा देण्याचं काम केल्यावर गोष्टी पूर्ण करण्यात तो खरोखर उत्कृष्ट कर्मचारी आहे.

इलॉन मस्क: नक्कीच

जॅक डोर्सी: उत्तम तुमच्यासाठी कधी सर्वोत्तम आहे? आणि तुम्हाला माझी मदत कुठे हवी असेल तर कृपया मला कळवा. मला फक्त हे अमेझिंग बनवायचे आहे.

इलॉन मस्क: तुमच्या मदतीची खूप प्रशंसा होईल

इलॉन मस्क: तुम्ही मला सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीशी मी सहमत आहे.

जॅक डोर्सी: छान! मी ही डील अयशस्वी होऊ देणार नाही यासाठी जे काही लागेल ते करेन.

इलॉन मस्क: अगदी

इलॉन मस्क: तुम्ही आणि मी पूर्ण सहमत आहोत. पराग अगदी हळू हळू पुढे जात आहे आणि अशा लोकांना खूश करण्याचा प्रयत्न करीत आहे जे त्याने काहीही केले तरी आनंदी होणार नाहीत.

जॅक डोर्सी: किमान हे स्पष्ट झाले की, तुम्ही एकत्र काम करू शकत नाही.

इलॉन मस्क: होय

यानंतरच मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा भार स्विकारताच पराग अग्रवाल यांची हाकालपट्टी केली. तसेच पहिल्याच दिवशी ट्विटरमध्ये आवश्यक बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.