४ एप्रिल १९७५ या दिवशी बिल गेट्स यांनी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. या कंपनीनेच त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवले. बिल आणि मेलिंडा हे १९८७मध्ये पहिल्यांदा भेटले होते.
न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेल्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्सने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २७ वर्ष एकत्रित संसार केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. ज्याची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. यापुढे एकमेकांसोबत राहू शकत नाही, असे कारण देत त्यांनी घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. पण बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसाठी ते यापुढेही एकत्रितपणे काम करणार आहेत.
बिल गेट्स यांनी मेलिंडा यांच्याशी एक करार केला होता, त्याची चर्चा सध्या सुरू आहे. बिल गेट्स यांनी लग्नानंतरही त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडशी भेटण्याबाबत मेलिंडा यांच्याशी करार केला होता. बिल यांच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव आहे अॅन विनब्लेड. १९९४मध्ये बिल अॅन विनब्लेडला डेट करत होते. विनब्लेडसोबत दरवर्षी एक आठवडाभर सुट्टी घालवण्याबाबतचा करार लग्नावेळी बिल यांनी मेलिंडाशी केला होता.
अमेरिकन पत्रकार वॉल्टर आयझॅकसन यांनी १९९७ मध्ये बिल आणि अॅन विनब्लेड यांच्या नात्याविषयी लिहिले होते की, “बिल गेट्स त्यांच्या पत्नीसोबत संसार करत आहेत, पण तरीही करारानुसार ते विनब्लेडसोबत दरवर्षी एक आठवडाभर सुट्टी घालवतात. उत्तर कॅरोलिनामधील समुद्रकिनारी असलेल्या कॉटेजमध्ये विनब्लेड आणि गेट्स राहत असत.
आयझॅकसनने पुढे म्हटले आहे की, १९९७नंतर ते दरवर्षी एकमेकांना भेटत होते, याबाबत काही स्पष्ट माहिती नाही, पण बायोटेक्नॉलॉजी हा त्या दोघांचा आवडता विषय होता. ब्रेकअप झाल्यानंतरही ते या एका गोष्टीमुळे एकमेकांजवळ राहिले. मेलिंडाशी लग्न करण्यापूर्वी बिल यांनी विनब्लेडला मेलिंडा आणि त्यांच्या जोडीबाबत विचारले होते. तेव्हा विनब्लेडने गुड मॅच असा रिप्लाय दिला होता.
दरम्यान, ४ एप्रिल १९७५ या दिवशी बिल गेट्स यांनी कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. या कंपनीनेच त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवले. बिल आणि मेलिंडा हे १९८७मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी मेलिंडा मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. १९९४मध्ये त्यांनी हवाईमधील लानी बेटावर लग्न केलं.
३१ व्या वर्षी बनले होते अब्जाधीश
बिल गेट्स वयाच्या ३१व्या वर्षी अब्जाधीश बनले होते. जगातील सर्वात कमी वयात अब्जाधीश बनण्याचा मान २००८ पर्यंत त्यांच्याच नावावर होता. २००८मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी अब्जाधीश होत फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी गेट्स यांचे रेकॉर्ड तोडले होते. आपल्या आवडत्या झाडाची देखभाल करण्यापासून ते आलिशान गाड्यांवर बिल गेट्स संपत्ती खर्च करतात. तसेच जगभरातील अनेक गरजूंनाही मदत करण्यासाठी ते आपली संपत्ती दान करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.